मागास जिल्हयांच्या यादीतून उस्मानाबादला बाहेर काढण्यासाठी कटीबध्द - पालकमंत्री रावते   उस्मानाबाद, दि.26 :-  नीती आयोगाने ज्या 125 मागास जिल्हयांची यादी जाहीर केली आहे त्यात उस्मानाबाद जिल्हयाचा क्रमांक 78 वा आहे, आपण सर्वांनी या जिल्हयाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करुन या यादीतून लवकरात-लवकर बाहेर पडण्यासाठी कटीबध्द होवू या, या जिल्हयाला स्वावलंबी प्रगत जिल्हा म्हणून नावलौकीक मिळवून देवूया, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक  दिनाच्या 68 व्या वर्धापन दिन  आज जिल्ह्यात सर्वत्र  उत्साहाने साजरा करण्यात आला.  ... ...

माझ्या शेतक-यांना आणि आम्हाला डिवचलात तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही – अजित पवार उस्मानाबादला विराट मोर्चाने सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल   उस्मानाबाद – माझ्या बळीराजाचे वीज कनेक्शन तोडू नका. अधिकाऱ्यांना सांगतो वीज तोडायला जावू नका तुम्हीही शेतकरी आहात. आमचा शेतकरी पैसा बुडविणारा नाही. मात्र तरीही शेतकऱ्यांना आणि आम्हांला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा सज्जड दम विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उस्मानाबादच्या विराट सभेमध्ये सरकारला दिला.   उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा नंतर ही अतिविराट सभा पार पडली. या सभेमध्ये अजित पवार यांनी सरकारला उलथवून टाकण्यासाठी मराठवाडयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन केले. शिवाय उस्मानाबादमधील जनतेला त्यांनी आवाहन करताना आपल्याला आपलं सरकार आणायचं असून याअगोदर दोन आमदार दिले होते आता तसे नको ... ...

लोहारा येथे महा आरोग्य शिबिरात 2 हजार 475 रुग्णांची आरोग्य तपासणी उस्मानाबाद : : लोहरा येथे बळीराजा चेतना अभियानांतर्गत महा आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 2 हजार 475 रुग्णांची तपासणी करण्यात आली. लोहारा येथे बळीराजा चेतना अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, सह्याद्री रुग्णालय उस्मानाबाद, आयुष, औषध विक्रेते संघटना, रोटरी क्लब, व्यापारी महासंघ स्वयंसेवी संस्था, मॅग्मो आदींच्या संयुक्त विद्यमाने महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी या शिबिराचे उद्‌घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करुन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा लांडगे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. चंद्रकला नारायणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंदराव सुर्यवंशी, नगरसेवक सर्वश्री ... ...

मोठी स्वप्न उराशी बाळगून एकजुटीने मोठे व्हा - खासदार सचिन तेंडुलकर उस्मानाबाद : सचिन…. सचिन…. सचिन…. सचिन…… या आवाजाने अवघे डोंजा गाव दुमदुमले होते. निमित्त होते मास्टर-ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची डोंजा गावास आजची भेट. डोंजा ग्रामस्थांनी सचिनच्या स्वागतासाठी प्रत्येक घरावर गुढी उभारली होती, दारात रांगोळया सजल्या होत्या तसेच गावच्या वेशीत भव्य कमान उभारण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत डोंजा गावाची निवड करण्यात आली, सचिन तेंडुलकर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील दत्तक घेतलेल्या डोंजा गावाच्या दौऱ्यावर आज आले असताना गावकऱ्यांनी मोठी स्वप्न उराशी बाळगून एकजुटीने मोठे व्हा, असे प्रतिपादन त्यांनी येथे केले. ...

तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघन सोहळा उस्मानाबाद- श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे 6 च्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्रीतुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा व आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व विधी  करण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. ... ...

हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेतून मराठवाड्याचा विकास : रावते उस्मानाबाद - हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात  जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक  आयुष्यभर  सक्रिय राहिले. ज्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेऊन प्राणार्पण केले अशा थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव सदैव राहील. थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाल्याचे मत पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केले.  69 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हैदराबाद मुक्तिसंग्राम प्रांगणातील हुतात्मा स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत होते. समारंभास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओम राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त ... ...

उस्मानाबाद कलेक्टर कचेरीसमोर शिवसेनेचे आंदोलन उस्मानाबाद, - शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमु्नतीसाठी तब्बल दोनवेळा आंदोलन करुनही सरकारने दखल न घेतल्याने सोमवार रोजी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. शेतकर्‍यांना कर्जमुक्ती  नेमकी कधी? असा सवाल करीत यापुढे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.  राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमुक्त  करण्याच्या घोषणेला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप एकही शेतकरी कर्जमु्नत झालेला नाही. आकड्यांचे आणि तारखांचे खेळ सुरु आहेत. शिवसेनेने शेतकर्‍यांची कर्जमु्नती नेमकी कधी? असा जाब विचारत यापूर्वी दोनवेळा आंदोलन केले. बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करुनही राज्य सरकार आणि थेट बँकांना जाब विचारुन शेतकरी कर्जमुक्त कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. शिवसेनेच्या कर्जमु्नती आंदोलनाच्या तिसर्‍या टप्प्यात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देऊन ... ...