उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन बीड - गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत वडवणी तालुक्यात  कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेल्या उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन,  जलवितरण व बंद नलिका प्रणाली कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.   या कार्यक्रमांना राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, वडवणीच्या नगराध्यक्षा मंगलाताई मुंडे, आमदार सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, विनायक मेटे, आर. टी.देशमुख, भीमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीताताई ठोंबरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, ... ...

वाचनाकडे मन वळवून ज्ञानाने समृद्ध व्हावे- जि. प. अध्यक्षा गोल्हार बीड : सध्याच्या वैज्ञानिक युगात मुलांमध्ये व्हॉटस अॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. यामुळे आपल्या संस्कृतीचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी ग्रंथ हेच गुरु आहेत. यामुळे प्रत्येकाने आपले मन वाचनाकडे वळवून ज्ञानाने समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बीडच्या वतीने ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, शिक्षण विभागाचे बापूसाहेब हजारे, अनंतराव चाटे, म. दा. शहाणे मंठेकर, संदिप नेकडे, प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी दि.ना.काळे आदी उपस्थित होते. श्रीमती गोल्हार म्हणाल्या की, भारताच्या ... ...

धनंजय यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी किती रुपये घेतले होते -पंकजा मुंडे बीड- पाच जिल्हा परिषद सदस्यांच्या बदल्यात सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून 15 कोटी रूपये घेतल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी बंधू धनंजय यांच्यावर पलटवार केला आहे. ज्या चुलत्याने ( दिवंगत गोपीनाथ मुंडे) राजकारणात आणलं, अनेक पदे दिली, आमदारकी दिली, सत्ता असती तर मंत्रीही केलं असतं, त्यांच्याशी गद्दारी करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी धनंजयराव तुम्ही राष्ट्रवादीवाल्यांकडून किती कोटी रूपये घेतले होते असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. सोमवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये होते. त्यावेळी अजित पवारांनी व धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच पंकजा मुंडेंकडून धसांनी 15 कोटी रूपये घेतल्याचा गंभीर आरोप धनंजय यांनी केला होता. यानंतर मागील 24 तासात एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या ... ...

विविध ‍विकास कामांना गती देवून कामे वेळेत पुर्ण करावी-  पंकजा मुंडे बीड :- जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देवून लवकरात लवकर कामे वेळेत पूर्ण करावीत अशी सुचना ग्राम‍विकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केली.           पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत उपस्थित संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.           पुढे बोलतांना श्रीमती मुंडे म्हणाल्या की, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेवून प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करुन जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल होऊन जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर  पोहचेल ... ...

"विकास' येरवड्याच्या रुग्णालयात आणि "अच्छे दिन' फक्त जय शहा यालाच : धनंजय मुंडे   राष्ट्रवादी कॉंग्रेसने बीडमध्ये धडक मोर्चा बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2014 मधले भाषण लोक विसरलेले नाहीत. सबका साथ सबका विकास, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली. पण, विकास येरवड्याच्या रुग्णालयात आणि जय अमित शहायालाच अच्छे दिन आल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. यावेळी पंकजा मुंडे यांच्यावरही त्यांनी टिका केली. यावेळी प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित यांनीही सरकार विरोधात टोलेबाजी केली.    शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरील मागण्यांसाठी सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बीडमध्ये मोर्चा काढला. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात माजी मंत्री प्रकाश सोळंके, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार उषा दराडे, पृथ्वीराज साठे, सय्यद सलिम, राजेंद्र जगताप, बजरंग सोनवणे, संदीप ... ...

मोर्चाच्या निमित्ताने राष्ट्रवादीत पुन्हा सवतासुभा बीड – सोमवारी बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या महामोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पक्षातील सवतासुभा समोर आला असून जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यासह नंदकिशोर मुंदडा यांच्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कुरघोडी केली आहे. मोर्चाच्या निमित्ताने ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टर्स आणि बॅनरवरून या दोघांचे फोटो तर सोडाच परंतु साधा नामोल्लेख करण्याचेही टाळले आहे. बीड जिल्ह्याचे नेतृत्त्व करण्यासाठी गेली काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेले राजकारण आता लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेली काही महिन्यांपासून जयदत्त क्षीरसागर आणि नंदकिशोर मुंदडा यांची कुचंबना सुरूच आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवत क्षीरसागर यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान धनंजय मुंडे यांनी जिल्हा नेतृत्वाची कमान सांभाळून स्वत:चे वर्चस्व सिध्द करण्यासाठी ... ...

‘त्या’ सहा जि.प. सदस्यांच्या अपात्रता आदेशाला स्थगिती; पंकजा मुुंडेंचा दिलासा बीड : पक्षादेश डावलल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सहा जि.प. सदस्यांना अपात्र करण्याच्या निर्णयाला अखेर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे माजी मंत्री सुरेश धस गटाच्या पाच व जयदत्त क्षीरसागर समर्थक एका सदस्याला दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीदरम्यान राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या धस समर्थक पाच सदस्यांनी पक्षादेश डावलून भाजपला मतदान केले होते तर आ. क्षीरसागर गटाच्या मंगल डोईफोडे आजारी असल्याचे सांगून मतदानाला गैरहजर राहिल्या होत्या. सर्वाधिक सदस्य निवडून येऊनही राष्ट्रवादीला जि.प. मधील सत्ता गमवावी लागली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीचे गटनेते बजरंग सोनवणे, सदस्या मंगल सोळंके, अजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडे सुनावणी झाली. 17 ऑक्‍टोबर रोजी जिल्हाधिकारी सिंह यांनी पक्षादेश ... ...