बीडमध्ये 2019 पर्यंत रेल्वे धावणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र नारायण गडावरील विविध विकासकामांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण   बीड, दि. १५ : सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेची संधी मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून सत्ता हे सेवेचे माध्यम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   श्री क्षेत्र नारायण गडावरील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, श्री क्षेत्र नारायण गड देवस्थानचे महंत शिवाजी महाराज, माजी राज्यमंत्री सुरेश धस, बदामराव पंडित, आमदार सर्वश्री विनायक मेटे, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, आर.टी. देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हेर, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी देवेंद्र ... ...

श्री क्षेत्र नारायण गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण बीड, दि. १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र नारायण गडावरील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी या परिसरातील शाळा महाविद्यालयांमधील ११०० विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींचे वृक्षारोपण केले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार सर्वश्री विनायक मेटे, आर.टी. देशमुख, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. के. महाजन तसेच वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. संत कुलभूषण नगद नारायण यांच्या समाधीचे मुख्यमंत्री यांनी घेतले दर्शन, विविध विकास कामांचे भूमिपूजन   ...

बीड जिल्ह्यातील एक लाख 13 हजार शेतक-यांना कर्जमाफीचे 478 कोटी रुपये वितरीत- पंकजा मुंडे बीड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यातील एक लाख 40 हजार 36 पात्र शेतकऱ्यांसाठी 545 कोटी 29 लाख रुपये प्राप्त झाले असून त्यातील एक लाख 13 हजार 664 शेतकऱ्यांना 478 कोटी 56 लाख रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आलेला आहे. या कर्जमाफीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समांरभ बीड येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, मुख्य कार्यकारी धनराज निला, जिल्हा पोलीस ... ...

सोशल मीडियाचा वापर करतांना नागरिकांनी जागरुक असणे गरजेचे - उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर बीड : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक नागरिकांचा सोशल मीडिया व ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले असून सोशल मीडियाचा वापर आणि ऑनलाईन व्यवहार करतांना आपली फसवणूक होणार नाही. यासाठी नागरिकांनी स्वत: जागरुक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी केले. ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी माध्यम प्रतिनिधीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठक हॉल येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना श्री.खिरडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फॉरेन्सिक तज्‍ज्ञ मयुर लोमटे, ... ...

२०१९ ला परळीसहीत बीडचे सर्व मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या - अजित पवार राष्ट्रवादीच्या परळी बालेकिल्ल्यात विक्रम मोडणारी विराट सभा... परळीचा पालक,मालक,चालक आणि कर्तबगार नेता...दादा आणि तटकरेंनी केली स्तुती... साडेसात किलोमीटरच्या भव्य मोटरसायकल रॅलीने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्वागत... हल्लाबोल आंदोलनातील सर्वात विक्रमी सभा,राष्ट्रवादीच्या नेत्यांनी परळीकरांची मने जिंकली... परळी  -हल्लाबोल यात्रा सुरु करताना या आंदोलनाला इतका जबरदस्त पाठिंबा मिळेल याची मला देखील कल्पना नव्हती. पण जनता या सरकारला त्रस्त झाली आहे, हे परळीच्या सभेला जमलेल्या गर्दीवरून दिसत आहे. मागे बीड जिल्ह्याने परळी सोडून सर्व जागा निवडून दिल्या होत्या. आता बीडने परळी सहित सर्व जागा निवडून द्याव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केले.   हल्लाबोल आंदोलनाच्या आजच्या ... ...

वैद्यनाथ दुर्घटनाः मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी सहा लाखांची मदत – पंकजा मुंडे बीड – वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये व माझ्याकडून एक लाख असे एकूण सहा लाख रुपये आणि जखमींना दीड लाख रुपये मदत देण्याची घोषणा महिला बालविकास मंत्री मुंडे यांनी आज केली. दरम्यान, मयताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्याच्या सेवेत सामावून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत 12 कर्मचारी जखमी झाले होते, त्यातील सुभाष कराड, मधुकर आदनाक, गौतम घुमरे या तीन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर अन्य जखमींवर लातूर येथील डॉ. विठ्ठल लहाने यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे, कारखान्याच्या संचालिका ऍड. यशश्री मुंडे यांनी जखमींची भेट घेतली व त्यांच्या ... ...

धनजंय मुंडेंना कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच रोखले पांगरी- पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कारखान्‍याची पाहणी करण्यासाठी आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पोलिसांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याचा प्रयत्न केला. दहा मिनिटांच्या बोलाबोलीनंतर त्यांना आत सोडण्यात आले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मालकीचा आहे. दोन दिवसापूर्वी पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात रसाची टाकी फुटून मोठी दुर्घटना  घडली होती . आतापर्यंत या घटनेतील पाच जखमींचा मृत्यू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी वैद्यनाथ कारखान्यावर पोहोचले. मात्र गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपत पाळवदे यांनी प्रवेशद्वारावरच धनंजय मुंडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना आत कारखान्यामध्ये सोडता येणार नाही असा पवित्रा पाळवदे यांनी घेतला. मात्र, मी कारखान्याचा सभासद असल्याने मला इथे येण्याचा ... ...