बीड (प्रतिनधी):- शिक्षणापसुन वंचित असलेल्या व हालखीचे जिवन जगणाऱ्या मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवानी एकीची वज्र ुठ आवळली आहे. जिल्हाभरात ठिकठिकाणच्या तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. फलकांच्या माध्यमातुन फुकटचे राशन नको आरक्षण हवे अशा भावना व्यक्त केल्या. कोणाताही गटतट न मानता सर्व समाजबांधव एकत्र आले. जमिअत उले ा हिंदने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले तर काही ठिकाणी मुक मोर्चही काढण्यात आले. जिल्ह्यात मंगळवारी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र धरणे आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये जमिअतच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडुन धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वच मुस्लिम नेत्यांसह विविध संघटनांचे पदधिकारी, कार्यककर्ते, विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि नागरिक मोठया संख्येंने सहभागी झाले होते. जमिअतचे मुफ्ती मोहमंद जावेद हुसेनी, मुफ्ती मोहमंद जावेद ... ...