लोहा (प्रतिनिधी) - लोहा तालुक्यातील आजमवाडी गावाला नवीन रस्ता व पूल करून द्यावा या प्रमुख मागणीसाठी आजवाडीचे ग्रामस्थ वाहत्या पाण्याच्या ओढ्यात आमरण उपोषणाला खाटा टाकून बसले आहेत. दि. 18 ऑक्टोबर रोजी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लोहा तालुक्यातील आजमवाडी या गावाला कंधार-लोहा रोडवर येण्यास दळण-वळणाच्या सोयीसाठी रस्ता व पूल करावा या मागणीसाठी ग्रामस्थ हे वाहत्या पाण्याच्या ओढ्यात खाटा टाकून आमरण उपोषणास दि. 17 ऑक्टोबरपासून बसले आहेत. तहसीलदाराला दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांनी असे नमुद केले की, आजमवाडी ता. लोहा, जि. नांदेड हे 600 लोकसंख्या असलेले गाव असून ते लोहा शहरापासून 6 कि. मी. अंतरावर आहे. या गावातून लोकांना दररोज शहराकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे. त्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. वेळावेळी प्रशासन, आमदार, खासदार, मंत्री महोदय यांना निवेदन देऊन तरी पण आमच्या गावचा पूला व रस्ता अद्यापही झालेला नाही. पावसाळ्यात शेतकऱ्यांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच बाजाराला येणाऱ्या मंडळींना, गरोदर ... ...