मुळ आदिवासींनी दिला ‘बोगस हटाव’ चा नारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा धडक मोर्चा नांदेड-आदिवासी समाजाच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यासह मराठवाड्यातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने पारंपारीक वेशभुषेत सहभागी झाले. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. सुमारे 50 हजाराहुन अधिक मुळ आदिवासी बांधव या धडक मोर्चात सहभागी झाले होते. राज्यात बोगस आदिवासींनी अनेक योजनेचा फायदा घेतला आहे. बोगस आदिवासींना खैरात वाटप करुन सरकारने मुळ आदिवासीवर अन्याय केला असून हा अन्याय दुर करावा तसेच मुळ आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, आ. संतोष टारपे, माजी आ. भिमराव केराम, माजी आ. उत्तम इंगळे, राज्य आदिवासी कल्याण संघाचे माजी राज्याध्यक्ष दादाराव टारपे यांनी ... ...

जोर लगा से हायश्याssss….. वाय-फाय आले पण... ढकल स्टार्ट नाही गेले..! लोहा -एस.टी च्या दुर्दशेला ‘अच्छे दिन’ आलेच नाही. यंदाच्या दिवाळीत कर्मचारी संपावर गेले आणि महामंडळाच्या कारभाराचा ‘पोलखोल’ झाला. जेथे कर्नाटक च्या एसटीचा झगमगाट तेथे ‘आमची बस’ अजूनही खाद्खादीच ! कोटी रुपयांचा खर्च करून ‘वाय-फाय’ बसविलेल्या एसटीची ढकल स्टार्ट पणा काहीच गेलाच नाही...महामंडळाच्या सुधारणेच्या ‘दिवा(कर)’ अद्याप लागलाच नाही.      एसटी महामंडळात नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १९९० नंतर दिवस वाईट आले. या दिवाळीत ‘बस’ थांबली त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यासमस्येला वाचा फुटली. महामंडळाच्या नांदेड जिल्हा आगारासाठी डॉ. श्याम पाटील तेलंग हे नेत्ररोग तज्ञ आहे. या चालकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांच्या तील ‘दोष’ व ‘दृष्टी’ संदर्भात उपचार करतात. संवेदनशील मनाच्या डॉक्टरांनी दरवर्षी एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी ‘फराळ’ ठेवतात. यंदा ‘दिवाळीत’ वेतनासाठी ... ...

आ. चिखलीकरांच्या नेतृत्वावर लोहा कंधारच्या जनतेचा  विश्‍वास  लोहा - लोहा -कधार तालुक्यातील जनतेचा आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्;या नेतृत्वावर दृढ विश्‍वास असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पं.स. माजी सभापती खुशाल पाटील यांच्या पत्नीचे निधन झाले आणि लोहयातील सरपंच सदस्यांचा नियोजित  सत्कार सोहळा तीन  तासानंतर   पुन्हा घेण्याचे जाहीर केले. सकाळचा कार्यक्रम  दुपारी अडीच वाजता झाला तरी खचा खच  गर्दी होती . नांदेड मनपा निवडणूकी नंतर या दोन्ही तालुक्यात  ज्या वावडया उठविण्यात येत होत्या त्याला या भागातील मतदारांनी फोल ठरविल्याचे स्पष्ट दिसले.लोहयातील व्यंकटेश गार्डनमध्ये पंचायत समिती चे सभापती सतीश उमरेकर, उपसभापती बालाजी पाटील  कदम व सह कार्यानी  लोहा- कंधार तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कारांचे आयोजन  केले होते. सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्याम सुंदर शिंदे, प्रवीण पाटील, तुकाराम वारकड गुरूजी, प्रणिताताई देवरे,, ... ...

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोह्यात आंदोलन, उर्जामंत्र्यांच्या पुतळा जाळला लोहा -दुष्काळाच्या चक्रात सापडलेल्या शेतक-यांच्या जखमेवर ‘मदती’चा मलम लावण्याऐवजी कृषीपंपाचे कनेक्शन तोडून मीठ चोळणाऱ्या सत्ताधारी भाजप सरकार विरुद्ध लोह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने विद्धुत मंडळाच्या कार्यालय समोर आंदोलन केले. तदनंतर शिवाजी चौकात रायूकॉचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली उर्जामंत्री बावनकुळे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर सकाळी भाजीमंडई चौकात वंजारी युवा संघटनेच्या वतीने आ अमरसिंग पंडीत विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले        राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कृषीपंपाचे कनेक्शन तोडू नये यासाठी लोहा उपविभाग विद्धुत कार्याला समोर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जि.प. माजी उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सह्हायक अभियंता ... ...

पदवीधर मतदार संघातून १० उमेदवार निवडणुकीद्वारे स्वारातीम अधिसभेवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र शासनाचे एकरूप परिनियम क्र. १ मधील तरतुदीनुसार विद्यापीठ अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या पदवीधर मतदार संघातून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. मंगळवार, दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.००वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या हॉल क्र.३११मध्ये मतमोजनीला सुरुवात झाली. रात्री तीन वाजेपर्यंत चाललेल्या मतमोजणीचा निकाल पुढीलप्रमाणे आहेत. पदवीधर मतदार संघातील सर्वसाधारण गटातून निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या गटामध्ये एकुण मतदान ६८७७ झाले असून यामध्ये अवैद्य मतदान ७२६ झाले. अकराव्या फेरीअखेर विक्रम पंतंगे यांना १०४८, युवराज पाटील यांना ९८९, नारायण चौधरी यांना ९६३, महेश मगर यांना ८७९ आणि संदीप जगदाळे यांना ... ...

रस्त्यांच्या कामांसाठी नांदेडला 8 हजार 474 कोटीचे पॅकेज -नितीन गडकरी राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी 40 टक्के सिंचन निर्माण करणार नांदेड- विकास साधण्यासाठी प्रत्येक गावाला रस्ते, वीज, पाणी, रोजगार आवश्यक असते. त्यामुळे केंद्र सरकार मराठवाड्यात रस्ते आणि सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात करत आहे. नांदेड जिल्ह्याला रस्ते विकासासाठी 8 हजार 474 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात 40 टक्के सिंचन निर्माण करण्याचे शासनाचे नियोजन आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, नौकानयन व जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांनी केले. श्रीक्षेत्र माहूर येथे रस्त्याच्या 4 कामांच्या भुमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.   ...

कर्जमाफीसाठी पात्र शेतक-यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते  वितरण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा शुभारंभ नांदेड : दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर बळीराजाला दिवाळीची भेट म्हणून राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करुन दिवाळी गोड केली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. ते जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री.खोतकर म्हणाले की, निसर्गाच्या अवकृपेमुळे ... ...