लोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षपदी संजय पाटील कर्‍हाळे. लोहा - मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष बांधणी सुरू केली असून पाच वर्षा नंतर पुन्हा एकदा जि.प.चे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कर्‍हाळे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदी करण्यात आली.राष्ट्रवादी किसान मंचाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, राकॉचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील धोंडगे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले व सत्कार केला. माजी शिक्षण सभापती संजय पाटील कर्‍हाळे यांना नव्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पक्षाची जबाबदारी देण्यात आली असून यापुर्वी त्यांना पक्ष संघटनेतुन जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आले होते . संघटन कौशल्य त्यांच्यात असल्यामुळे माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली यावेळी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, जि.प. सदस्य अ‍ॅड. विजय धोंउगे, माजी जि. प. उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे युरॉका  तालुकाध्यक्ष शिवराज ... ...

वंचितांना न्याय देण्यासाठी पत्रकारांनी समाजाचे नायक व्हावे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणदिनानिमित्त अभिवादन नांदेड : वंचित घटकांना न्याय देण्यासाठी पत्रकारांना समाजाचा नायक या भुमिकेतून सकारात्मक दृष्टीने काम करावे लागेल, असा सूर आज येथे व्यक्त झाला. निमित्त होते दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन संस्थेतील संगणक शास्त्र विभागाचे प्रा.डॉ. शिरीष कोडगीरे होते. एमजीएम शिक्षण संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, अनिकेत कुलकर्णी, आकाशवाणीचे सहायक निदेशक भिमराव शेळके, सकाळचे सहयोगी संपादक संजय कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे लातूर ... ...

नांदेड - सहा खाजगी वाहनांसह दोन दुकानांना लक्ष्य,परभणी जिल्ह्यात 8 बस फुटल्या नांदेड- पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा येथे सोमवारी घडलेल्या घटनेचे पडसाद मंगळवारी नांदेड जिल्ह्यात उमटले. येथे जमावाने दोन बसवर दगडफेक करून सहा खाजगी वाहनांसह दोन दुकानांना लक्ष्य केले. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली.  वजिराबाद परिसरातील चार खाजगी वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनांच्या काचा फुटल्या. परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच सायंकाळी चार वाजता पेनूरहून नांदेडकडे येणार्‍या राज्य परिवहन मंडळाच्या बसवर मीलगेट परिसरात अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या बसमधून ७२ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने यामध्ये कुणालाही जीवितहानी झाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे वाहन दुरुस्तीसाठी नई आबादी परिसरात आले होते. दुपारी काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करून घोषणाबाजी ... ...

कंधार तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन कर्जमाफी योजनेचा राज्यातील 50 लाख शेतक-यांना लाभ   नांदेड :- तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध तहसील कार्यालयाशी या-ना-त्या कारणाने येत असतो, तेव्हा कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या दिसण्यावर ते कार्यालय चांगले की वाईट हे ठरत नसून ते कार्यालय लोकांना कशा प्रकारे सेवा देते, न्याय देते यावर ठरते. हे सरकार गरिबांसाठी काम करणारे आहे, तेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सर्वच घटकांनी जनतेचे सेवक म्हणूनच काम करावे. राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा 50 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.   कंधार तालुका तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन ... ...

गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम - मुख्यमंत्री   श्री. गुरु गोविंद सिंग यांच्या 350 व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाचा समारोप गुरुद्वाराचे 61 कोटीचे कर्ज माफ करण्यात येईल नांदेड:- गुरु गोविंद सिंग यांचे संपूर्ण जीवन हे संघर्षमय असून आपल्या समाजाचे गुलामीपासून व संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी आपल्यासह संपूर्ण परिवाराचे बलिदान करुन एक लढवय्या पंथाची स्थापना केली. त्यामुळे गुरु गोविंद सिंग म्हणजे भक्ती व शक्तीचा संगम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.    नांदेड येथील गुरुद्वाऱ्यामध्ये श्री. गुरु गोविंद सिंग यांच्या 350 व्या प्रकाशपर्व कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार सर्वश्री सरदार तारा सिंग, हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, ... ...

शिक्षणाचे बाजारीकरण रोखा - श्रीराम पवार प्रा.राजाराम वट्टमवार यांचा अमृतमहोत्सवी सोहळा थाटात  पत्रकार संदीप काळे संपादित ‘आईमनाचा गुरू’ पुस्तकाचे प्रकाशन नांदेड  - शिक्षण क्षेत्रात विषमता निर्माण झाली असून शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते ग्राहक व पुरवठादारांप्रमाणे होत असून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व फुलविणाऱया, चांगले व्यक्तिमत्त्व घडविणाऱया शिक्षकाची देशाला, समाजाला नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करत शिक्षणामध्ये वाढत चालेले बाजारीकरण रोखले जावे असे अवहान ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी केले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक राजाराम वट्टमवार यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. प्रा. वट्टमवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन पीपल्स कॉलेजमधील नरहर कुरुंदकर सभागृहात करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी सकाळ मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक श्रीराम पवार हे होते, ... ...

डॉ.मुलानी यांनी कुलसचिवपदाचा पदभारस्विकारला नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सतरावे कुलसचिव म्हणून डॉ.रमजान मुलानी यांनी आज बुधवार, दि.२२ नोव्हेंबर रोजी पदभार स्विकारला. दि.२१ नोव्हेंबर रोजी झालेल्या कुलसचिव पदाच्या मुलाखतीमध्ये त्यांची निवड झाली. गेल्या आठ महिन्यापासून प्रभारी कुलसचिव पदाचा कार्यभार ते सांभाळत होते. आत्ता ते पूर्णवेळ कुलसचिव म्हणून विद्यापीठाचा कार्यभार सांभाळणार आहेत. अत्यंत गोड आणि मनमिळाऊ स्वभावाचे डॉ.मुलानी हे २००९ पासून विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एकूण सत्तावीस वर्षाच्या त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीमध्ये १८ वर्षे मुंबईमध्ये शैक्षणिक आणि संशोधनामध्ये त्यांनी योगदान दिले आहे. मुंबई येथील रुईया महाविद्यालयामधील वनस्पतीशास्त्र विभागामध्ये त्यांनी संशोधन केले. त्यानंतरचे पुढील संशोधन मुंबई विद्यापीठामध्ये पूर्ण केले. अंधेरी येथील एलयुएमव्ही ... ...