परभणीचे पत्रकार भवन मनपाच्या ताब्यात ! परभणी - शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या लगत बहुमजली पत्रकार भवनावर गेल्या दोन तपांपासून अनाधिकृत ताबा करणार्‍यांना मनपाने दणका दिला आहे. मनपाच्या वतीने इमारतीवर बुधवार दि.18 ऑक्टोबर रोजी नोटीस डकविण्यात आली असून ज्यात इमारतीचा ताबा 33 दिवसांच्या आत मनपाकडे देण्यात यावा अन्यथा 81 नुसार मनपा ताबा घेईल, असे स्पष्ट केले आहे .   या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांनी डकविलेल्या नोटीसत म्हटल्या प्रमाणे,साल 1993 दरम्यान परभणी जिल्ह्यातील तत्कालीन पत्रकारांनी शासनाकडे पत्रकार भवनासाठी जागा मागीतली होती. त्यानुसार शासनाने पालिकेची जागा देऊन इमारतीच्या बांधकामासाठी लाखो रूपयांचा निधी राज्य शासनाने दिला होता. मात्र तत्कालीन काही पत्रकारांच्या समुहाने जिल्हा पत्रकार संघाच्या नावे मिळालेली जागा व निधीचा गैरवापर केला.  स्वताच्या नावे धर्मदाय कार्यालयात पत्रकार भवन या नावाने न्यास स्थापन करून ही जागा आणि निधी अनाधिकृत रित्या आपल्या खिशात घातल्याचे ... ...

मोदींची जीएसटी मोठ्या पन्नास उद्योगपतींसाठीच ः खा. राहुल गांधी परभणी प्रतिनिधी - मुळात जीएसटीची संकल्पना कॉंग्रेसचीच आहे. मात्र मोदींची जीएसटी मोठ्या पन्नास उद्योगपतींच्या फायद्यासाठीची आहे. यामध्ये लहान व्यापारी संपणार आहेत. करप्रणालीचे काम आस्थेने आणि विचारपूर्वक व्हायला हवे. १८ टक्क्याहून अधिक कर आकारल्या जाऊ नये, असे आमचे विचार होते. मात्र मोदींनी २८ टक्क्यापर्यंत कर वाढवला. व्यापार्‍यांना १२ महिन्यात १२ फॉर्म भरावे लागत आहेत. काम सोडून फॉर्मच भरायचे का, असा सवाल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी परभणीत उपस्थित केला. तसेच एकदा व्यापार्‍यांनी फॉर्म भरला की, इन्कम टॅक्स व इतर खात्याचे लोक मागे लागणार. मोदींना जीएसटीचा ड्रामा करायचा होता. म्हणून रात्री १२.३० वाजता जाहिर केली, अशी टीका देखील राहुल गांधींनी केली.  परभणीतील नूतन विद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी दुपारी ५ वाजता झालेल्या संघर्ष सभेत राहुल गांधी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ... ...

परभणीच्या शिवसेना खासदार-आमदारात समेट परभणी  - जिल्ह्यातील शिवसेना खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्यातील मतभेद शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष मुंबई येथे मातोश्रीवर मिटल्याचे शिवसेनेतर्फे जाहिर करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षातील त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाने गणेश विसर्जन मिरवणुकीत पेट घेतला होता. ही खबर मातोश्रीवर पोहचताच या दोघांनाही बोलावून समज देण्यात आली. शिवसेना खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यात बाजार समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकी दरम्यान खटके उडाले होते. पाडापाडीच्या राजकारणामुळे त्यांच्यातील संघर्ष वाढत गेला. यापुर्वी दोनवेळा मुंबईतच वरिष्ठ नेत्यांसमोर त्यांच्यातील वाद मिटवण्यात आले होते. तरी देखील त्यांच्यातील धुसमुस सुरूच होती. त्याचा विसर्जन मिरवणुकीत भडका उडाला. अगदी एकमेकांच्या अंगावर जावून बाचाबाची झाल्याने शिवसेनेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हा वाद शिवसेनेला येणार्‍या निवडणुकांमध्ये ... ...

महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. नवी दिल्ली - महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रवासी भारतीय भवन येथे महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री कृष्णाराज, सचिव राकेश श्रीवास्तव, अपर सचिव अजय टिक्री आणि संयुक्त सचिव राकेश कुमार उपस्थित होते. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशभरातील ५१ अंगणवाडी सेविकांना यावेळी गांधी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. २५ हजार रूपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूर जिल्हयातील गोपालपूर येथील केंद्राच्या चंद्रकला झुरमुरे ,परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील पडेगाव अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका लताबाई वांईगडे आणि ... ...

शेतक-यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- किशोर तिवारी परभणी : कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नाविषयी सकारात्मक प्रयत्न करीत असून सर्व शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते.  जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती भावना नखाते, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सवडे, अपर पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे आणि निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे याची प्रमुख उपस्थिती होती. श्री.तिवारी म्हणाले , शेतकऱ्यांना कर्ज माफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या कर्जमाफीसाठी घातलेले निकष आणि अटी या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहेत. खरीप हंगामाच्या ... ...

श्रष्टी दिवटे हिच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन   परभणी - यवतमाळ येथील सामाजीक कार्यकर्ती श्रष्टी दिवटे हिच्यावर राजकीय सूड बुद्धीतून खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली असल्याने तिच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचा वतीने 18 ऑगस्ट रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तिच्या वडिलांचा मागील 8 महिन्यांपूर्वी खून करण्यात आला होता या प्रकरणाची श्रष्टी ही एकमेव साक्षीदार आहे म्हणून काही दिवसांपासून तीला व तिचा कुटुंबातील व्यक्तींना त्या गुंडांकडून त्रास देणे चालू आहे त्यामुळे तिच्यासह कुटुंबातील व्यक्ती भयभीत झाले आहेत त्यातच तिला मदत करण्या ऐवजी राजकीय दबावाखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत महिला व मुलींचावर होणारे अत्याचार यांचेवर मेळावे आयोजीत करून सरकारला जागे करण्याचे काम करणारी तसेच सामाजीक ... ...

जिंतूर पोलिसाची अवैध व्यावसायिकांवर कारवाई  परभणी  -  तालुक्यातील अवैधरीत्या चालू आपले धंदे राजरोस चालू आहे त्याच्या वर पोलिसांनी धडक कारवाई केली यामुळे अनेकांनी पळ काढला आहे. गुरूवारी  रोजी  मा.उप.वि.पो.अधिकारी अनिल घेरडीकर  यांचे मार्गदर्शनाखाली पोनि प्रविण बा.मोरे यांनी विशेष पथक स्थापन करुन पो.स्टे.जिंतुर अंतर्गत अवैध धंदे चालवणा-या इसमांवर कारवाई केली. सदर कारवाई मध्ये 3 मटका जुगारावर केसेस करण्यात आल्या असुन सदर गुन्ह्यात आरोपी मोईन खान रहमान खान पठाण, शे.सलीम शे.नजीर दो.रा.गुलशन काॅलनी,जिंतुर, अशोक दिनकरअप्पा तरटे रा.खैरी प्लाॅट,जिंतुर, दिगंबर दगडुअप्पा तरटे रा.वडाळी ता.जिंतुर, प्रकाश बाबुराव नवसागर रा.खैरी प्लाॅट, जिंतुर,शंकर जयराम आवसेकर रा.खैरी प्लाॅट,जिंतुर, सुरेश जैस्वाल रा.संभाजी नगर, जिंतुर यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचे ताब्यातुन 15 हजार 450 रुपये नगदी व मटका जुगाराचे साहीत्य असा मुद्येमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई काकडे, बुधवंत, शे.ताजोद्यीन, ... ...