परभणी (प्रतिनिधी) ः महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्यावतीने दिला जाणारा पुरस्कार नुकताच वितरीत करण्यात आला. येथील कृषी विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक रत्नाकर गुट्टे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष भाई विकास शिंदे, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव आदींची उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या अडचणी व प्रश्नांची मांडणी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात नारीरत्न सौ. छायाताई शिंगाडे, ऍड. चंद्रभान धोतरे, अर्जुन  मुटकुळ, प्रा. सुनिता गोडगोडवार आदींचा सन्मान केला. सूत्रसंचालन बाबासाहेब कराड यांनी तर आभार विलास साखरे यांनी मानले. यावेळी गोविंद  लहाने, लक्ष्मण खंदारे, अशोक उबाळे आदी उपस्थित होते. ...

जितूर (प्रतिनिधी)ः जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके या वार्षिक कृती आराखड्यातील ग्रापंचायतमध्ये गावफेरी काढून व विशेष गाव बैठक घेऊन शौचालय बांधकाम केल्या नंतर आठच दिवसात अनुदान मिळण्याची हमी जिंतूर पं.स.चे  अंकुश चव्हाण यांनी दिली.  यावेळी सरपंच सौ वेणूबाई कोरङे, उपसरपंच सौ सिताबाई भालेराव, विस्तार अधिकारी (पं.) एस. एस. राऊत, विस्तार अधिकारी  (आरोग्य) आर. एम. वाघ, ग्रामसेवक ए. एस.रेंगे, देवसङीचे ग्रामसेवक व्ही. के. कांगणे, कान्हा ग्रा.पं.चे ग्रामसेवक एस. एम. मुंजे,  कक्षातील संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, समाजशास्त्रज्ञ परमेश्वर हलगे, डोहरा ग्रा.पं.चे उपसरपंच छत्रपती मानवते, ग्रामीण विकास सेवा संस्थेचे प्रकाश शिंदे,  राजपाल खिल्लारे,  ज्ञानेश्वर  कामिटे, सिद्धार्थ शिरसाट, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, आशाताई, अंगणवाङीताई व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गावात शौचालय नसलेल्या कुटुंबांना गृहभेटी देऊन शौचालय बांधकाम करण्याची विनंती करण्यात आले तसेच 20 शौचालय बांधकामाचे उद्‌घाटन करण्यात आले. 190 शौचालय बांधकामाचे ... ...

परभणी (प्रतिनिधी) ः देशात जातीव्यवस्थेच्या उदयापूर्वी धनगर जमात अस्तित्वात होती. मुळात लोकसाहित्याची निर्मिती धनगर साहित्यातून झाली. तो मूळ वारसा समजावून घेत संशोधन आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी सोलापुरात आदिवाशी धनगर साहित्य  संमेलनाची तयारी सुरू असल्याची माहिती लेखक डॉ. यशपाल भिंगे यांनी दिली.   सात आणि आठ जानेवारी 2017 रोजी पहिले धनगर साहित्य संमेलनाच्या आयोजनाची  माहिती देण्यासाठी रविवारी (ता.16) परभणी शहरातील औषधी भवन येथे बैठक घेण्यात आली. तदनंतर  सावली  विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भिंगे बोलत होते. संमेलनाचे संस्थापक डॉ. अभिमन्यू टकले, प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर, प्रा. विष्णू कावळे, चंद्रकांत हजारे, प्रा. महावीर हाके, सुरेश भुमरे, प्रा. तुकाराम साठे, मारोती पाटील, डॉ. सुधाकर पोले, ऍड. विष्णू मोगरे, विष्णू सायगुंडे, पांडुरंग गिणगिणे यावेळी उपस्थित होते. डॉ. भिंगे म्हणाले, धनगर साहित्य, इतिहास, संस्कृती, कला, नृत्य, ओव्या, बोली, वेषभूषा वेगळी असून ती समृद्ध आहेत. त्याचे एकीकरण आणि संवर्धन गरजेचे असल्याने ... ...

पाथरी, जिंतूर, सेलू, शहरातील मोर्चांनी शहर दणाणले: मोर्चा दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त टिम आनंद नगरी परभणी : मुस्लिम समाजाला 5 % टक्के आरक्षण देण्यात यावे या इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील गंगाखेड, पाथरी, जिंतूर, सेलू, सोनपेठ येथे मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढून प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले. देशातील मुस्लीम समाज हा अल्पसंख्याक असून हा समाज शिक्षण, नोकरी व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात आले पाहिजे या साठी जमिययते ऊलेमा एहिंद या संघटनेच्यावतीने बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत  मुस्लीम समाजाला आरक्षणापासून दूरच ठेवण्यात आल्यामुळे जिल्हाभरात आज मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात आले. पाथरी येथील पाथरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या वेळी या पाथरी तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर मौलाना खमरोद्दीन नदवी अध्यक्ष जमाते उलेमा हिंद पाथरी,  हाफेज अब्दुल जब्बार, मौलाना हारुन काशफी, ... ...

संजीवनी मित्र मंडळाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन परभणी (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशन मुंबईच्या मान्यतेने आणि संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने परभणी येथे ज्युनिअर गटाच्या मुला-मुलींच्या राज्य अजिंक्यपद बेसबॉल  स्पर्धेचे आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलच्या मैदानावर करण्यात आले आहे.  नोव्हेंबर महिन्यात दि. 7 ते 9 या कालावधीत स्पर्धा होणार आहेत. जिल्ह्यात बेसबॉल खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि ज्युनिअर गटाच्या मुलां-मुलींसाठी व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने स्पर्धा आनंद भरोसे यांनी आयोजित केल्या आहेत. मुला-मुलींचे 600 वर खेळाडू येणार असून त्यांच्या भोजन व निवासाची संपूर्ण व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.  क्रिकेटसदृश्य असणाऱ्या या खेळाची निवड नुकतीच टोकियो येथे होणाऱ्या सन 2020 च्या ऑल्म्पिकसाठी करण्यात  आलेली आहे. स्पर्धेनिमित्त विविध कमिटीचे आयोजन करण्यात येणार असून बेसबॉल स्पर्धांचा आनंद परभणीकरांना तीन दिवस अनुभवता येणार आहे. राज्य बेसबॉल  स्पर्धेच्या ... ...

जिल्हाधिकारी महिवाल यांचे स्वयंरोजगाराशी निगडित सर्व विभाग व यंत्रणांना निर्देश   परभणी (प्रतिनिधी) ः जिल्ह्यात विविध कृषीपुरक उद्योग तसेच रेशीम व दुग्ध व्यवसायाला चालना देण्यावर भर देऊन उद्योग, कृषी व अन्य संबंधित विभागांनी त्यांच्याकडे स्वयंरोजगारासाठी प्राप्त कर्ज प्रस्तावांचे  आराखडे तपासून परिपूर्ण करून ते प्रस्ताव बॅंक आणि प्रशासनाकडे वेळोवेळी पाठवावेत, असे  निर्देश जिल्हाधिकारी महिवाल यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वय समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम खरटमल, जिल्हा नियोजन अधिकारी पी. के. बिरादार, जिल्हा उद्योग अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे अधिकारी तसेच सदस्य सचिव तथा प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर उपस्थित होते. स्वयंरोजगाराशी निगडित असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा ... ...

पाथरी (प्रतिनिधी) ः तालुक्यातील तारूगव्हाण ते आमराई जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) वतीने करण्यात आली आहे. तालुक्यातील तारूगव्हाण ते आमराई हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यात खड्डा की, खड्‌ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी  ये-जा करतात. त्यांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था पाहता या रस्त्यावरून वाहनाची व्यवस्था होत नाही. तर बसेसही बंद राहत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. मात्र अद्याप याची दखल घेतली नाही. हा रस्ता तत्काळ दुरूस्त करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या मराठवाडा पक्ष प्रचारक सिद्धोधन ढवळे व तारूगव्हाणच्या ग्रामस्थांनी केली आहे. ...