देशभक्तांच्या त्याग व बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचालाभ जनसामान्यांना व्हावा- पाटील         स्वातंत्र्याचा लाभ जनसामान्यांना व्हावा- पालकमंत्री गुलाबराव पाटील    परभणी, दि.26 :- अनेक देशभक्तांच्या त्याग बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा लाभ जनसामान्यांना व्हावा यासाठी व्रतस्थ होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन सहकार ... ...

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे - बबनराव लोणीकर. जालना - केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविलेल्या असताना विरोधी पक्ष हल्लाबोल सारखे कोणताही ठोस मुद्दा नसलेली आंदोलने करून जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमींवर संघटना बळकटीसाठी तयारीला लागावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. परभणी येथील वरद मंगल कार्यालयात समाधान शिबिराच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. मोहन फड, माजी आ. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, बालाजी देसाई, आनंद भरोसे, मेघनाताई बोर्डीकर, डॉ. प्रफुल्ल पाटील, राहुलभैय्या लोणीकर, गणेश दादा रोकडे, श्यामसुंदर मुंढे, खंडेराव आघाव, डॉ. विद्याताई पाटील, डॉ. मीना परतणे, संजय साडेगावकर, मंगलताई मुग्दलकर, ... ...

शहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वोतोपरी मदत करणार - सुधीर मुनगंटीवार .                                                                     परभणी- शहीद सदाशिव त्र्यंबकआप्पा नागठाणे यांनी वनसंरक्षण व शासनाचे हित जोपासण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने करंजगाव वन क्षेत्रातील वनवा विझविण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीद नागठाणे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून शासन सर्वोतोपरी मदत करणार असे प्रतिपादन वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले .          शहीद सदाशिव  नागठाणे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मोहन फड, विजय गव्हाणे, अभय चाटे, विठ्ठल रबदाडे, महाराष्ट्र राज्याचे वन सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक एन. बी. गुदगे, ... ...

परभणी म.न.पा.च्या 62 कोटीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे भुमिपूजन परभणी - शासनाच्या अमृत अभियानांतर्गत परभणी मनपाच्या वतीने होणार्‍या पाणीपुरवठा योजनेतील 62 कोटी रुपयांच्या कामाचे भुमिपूजन गुरुवार रोजी विद्या नगर मध्ये माजीमंत्री सुरेश वरपुडकर, आयुक्त राहूल रेखावार, सभापती गणेश देशमुख व त्यांची पत्नी कोमल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कामात शहरातील 6 ठिकाणी जलकुंभ उभारले जाणार असून 170 कि.मी.ची पाणीपुरवठा पाईप लाईन शहरात टाकली जाणार आहे. विशेष म्हणजे या कामाला 2 वर्षाची काल मर्यादा असून या कालावधीत हे काम पूर्ण केले जाईल, अन्यथा ठेकेदाराला मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद असल्याची माहिती आयुक्त राहूल रेखावार यांनी दिली.         शहरातील विद्या नगरातील शिवाजी उद्यानात असलेल्या जलकुंभा शेजारीच या कामाचे भुमीपूजन पार पडले. या निमित्या आयोजीत कार्यक्रमाच्या व्यासपिठावर उपमहापौर माजू लाला,विरोधी पक्षनेते विजय जामकर,गटनेते चंदू शिंदे, मंगला मुदगलकर, जयश्री खोबे, डॉ. विद्या पाटील आदी उपस्थित होते. या ... ...

परभणी शहरासह  ग्रामीण भागासाठी प्रकल्पातील जलाशयात पिण्याचे पाणी आरक्षित – पालकमंत्री   परभणी : परभणी जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील पिण्याचे पाणी प्राधान्याने आरक्षित करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयात पिण्याचे पाणी आरक्षित करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा आणि नागरी व ग्रामीण भागासाठीच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन या बैठकीत संबंधित यंत्रणांकडून प्राप्त मागणीनुसार पाणी आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. परभणी जिल्ह्यात यंदा केवळ 70 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा फारसा समाधानकारक नाही. परभणी शहराला ... ...

अखंडीत वीज पुरवठ्यासाठी महावितरणने प्राधान्य द्यावे - पालकमंत्री गुलाबराव पाटील परभणी : परभणी जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात अखंडीत विज पुरवठ्यासाठी महावितरणने प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. महावितरणतर्फे आयोजित जिल्हा विद्युत नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला राठोड, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, ग्राहक आणि महावितरण यांच्यामधील संबंध अधिक समन्वयाचे असले पाहिजेत. वीज ग्राहकांच्या अडिअडचणी सोडविण्याला महावितरणने प्राधान्य दिले पाहिजे. अखंडीत वीज पुरवठ्यासाठी चांगल्या आणि दर्जेदार नियोजनाची व सेवासुविधेची गरज आहे. ज्या ... ...

रस्त्याचे पूर्ण चित्र बदलणार मराठवाडयातील एकही रस्ता खड्डेमय रहाणार नाही -ग्रामविकास मंत्री मुंडे               परभणी:– मराठवाडा ही माझी कर्मभूमी असून येणा-या आगामी काळात मराठवाडयातील एकही ... ...