शेतक-यांना बँकांनी तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे - सदाभाऊ खोत औरंगाबाद - मराठवाड्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांनी ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत साध्य करावे आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जाबाबत जनजागृती घडविण्यासाठी मेळावे आयोजित करावेत, अशा सूचना आज कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विभागीय आयुक्त यांच्या दालनात खरीप हंगामाचे नियोजनाबाबत आयोजित बैठकीत श्री. खोत बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अपर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, मराठवाड्यातील महसूल आणि कृषी विभागाचे, बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. खोत म्हणाले, शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या ... ...

शेतीपूरक व्यवसायांसाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - महादेव जानकर औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय उपयुक्त स्त्रोत असून या शेतीपूरक व्यवसायांसाठी शासनस्तरावरून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे केले. सिल्लोड येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मौजे भवन ता.सिल्लोड येथील दूध शितकरण केंद्राचे उद्घाटन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेवजी जानकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार, ज्ञानेश्वर तायडे, सभापती, पं.स. सिल्लोड, संचालक मंडळ सदस्य यांच्यासह इतर संबंधित मान्यवर उपस्थित होते. ...

शिवसेनेचा पोलिसांविरोधातील  मोर्चा अडविला औरंगाबाद : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही औरंगाबादमध्ये शिवसेनेने पोलिसांविरोधात मोर्चा काढला. शहरातील पैठण गेट भागातून हा मोर्चा काढण्यात आला. मात्र टिळक पथवर हा मोर्चा अडवण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा जाणार होता. पैठणगेट येथून निघालेला शिवसेनेचा  हिंदूशक्ती मोर्चा पोलिसांनी अडवला व तो एसबी शाळेकडे वळवला. येथील मैदानावर खासदार खैरे यांनी उपस्थितांसमोर भाषण केले.मोर्चा होऊच नये यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली. स्वत: प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पैठणगेटला येऊन बंदोबस्ताची पाहणी केली. दोन पोलीस उपायुक्त, चार सहायक पोलीस आयुक्त, पंधरा पोलीस निरीक्षक, तीस सहायक पोलीस निरीक्षक, ५०० पोलीस कर्मचारी, दंगाकाबू पथक, एसआरपीच्या सात तुकड्या, वङ्का, वरुण तसेच व्हिडिओ कॅमेरे असा तब्बल दोन हजारांचा फौजफाटा मोर्चाच्या बंदोबस्तासाठी लावण्यात आला होता. प्रथमच बॉडी प्रोटेक्टर असलेले ४० जवानांचे पथक आघाडीवर ... ...

अाैरंगाबाद हिंसाचार; दाेषींवर कडक कारवाई करु : मुख्यमंत्री दोघांचा मृत्यू,५२ जखमी अाैरंगाबाद: हिंसाचारामध्ये जे काेणी दाेषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला केंन्द्र सराकरकडून जाहीर झालेल्या पाच काेटी रुपयांच्या निधीचा धनादेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात अाला त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बाेलत हाेते. तसेच औरंगाबाद शहरात शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. औरंगाबादमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून, तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू ... ...

 औरंगाबाद दंगलीची उच्चस्तरीय   सखोल चौकशी-डॉ.रणजीत पाटील औरंगाबाद, दिनांक  12 -  औरंगाबादेतील घडलेल्या अप्रिय,दुर्देवी घटनेमुळे मोठ्याप्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. अशा घटना घडविणा-या विध्वंसक प्रवृत्तीला हानून पाडण्यासाठी सर्वोतोपरी उपाय अंमलात आणण्यात येतील. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल, सविस्तररित्या राज्यस्तरीय उच्चस्तर चौकशी करण्यात येईल. नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती मदत देण्यात येईल. तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शहरातील शांतता अबाधित व कायम ठेवावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज केले. सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. यावेळी औरंगाबादचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, किशनचंद तनवाणी, महापौर नंदकुमार घोडेले ... ...

औरंगाबादमध्ये दक्षतेसाठी इंटरनेट सेवा बंद औरंगाबाद : शहरात रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल सोशल मिडीयावरून अफवा पसरू नये म्हणून आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारामागे किरकोळ कारण असले तरी याबाबत सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरून इतर ठिकाणी हिंसाचार पसरू नये म्हणून पोलिसांकडून ही दक्षता घेण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहराच्या काही भागात अचानक हिंसाचार उफाळला यातून रात्रभर या भागात जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांच्या माहितीनुसार हिंसाचारामागे किरकोळ कारण होते मात्र जमाव आक्रमक झाल्याने मोठ्याप्रमाणावर हिंसाचार झाला. यामागे सोशल मिडियामधून पसरविण्यात आलेल्या अफवांचा मोठा हात असल्याचा संशय आहे. ...

औरंगाबाद शहरात तणावपूर्ण स्थिती औरंगाबाद -शहरात तणावपूर्ण स्थिती आहे .शहागंज ,राजाबाजार ,चेलीपुरा ,अंगुरीबाग , मोतीकारंजा परिसरात तणाव निर्माण झाला आहे . नागरिकांनी शांतता पाळावी ,अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे . मोतीकारंजा परिसरातीलअनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री भिडले. तलावरी, चाकू , लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त गोर्वधन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या.दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले.पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या ... ...