न्यायालयांच्या पायाभूत सुविधांना राज्य सरकारचे प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद खंडपीठाचा इमारत विस्तारीकरण कार्यक्रम औरंगाबाद, दि. 07 – न्यायदानाच्या व्यवस्थेत पायाभूत सुविधांचे महत्त्व आहे. अत्यावश्यक सुविधा असल्यास न्याय देताना अधिक गती मिळते. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाला राज्य सरकारकडून अपेक्षित असलेल्या सर्व पायाभूत सुविधा उचित कालावधीत पुरविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन इमारत विस्तारीकरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी, औरंगाबाद ... ...

डिजिटायझेशनमुळे पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान होईल - मुख्यमंत्री फडणवीस औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण औरंगाबाद, दि. 07  –डिजिटायझेशनमुळे राज्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होत आहे. डिजिटल संकल्पनेमुळे पोलिसांच्या कामात अधिक सुसूत्रता, शिस्तबद्धता व पारदर्शकता आली असून महाराष्ट्र हे डिजिटल पोलिसिंग राज्य झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या सुसज्ज तीन मजली इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.     या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी ... ...

पिटलाईनच्या सुविधेसाठी याचिका ,रेल्वेला नोटीस आैरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने चिकलठाण येथे पिटलाईन उभारण्याचा प्रस्ताव कुठलेही संयुक्तीक कारण न देता रेल्वे मंत्रालयाने फेटाळला. सदरचा प्रस्ताव रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी सर्व्हेक्षण करूनच सुपुर्द केला होता. सदर प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून नांदेड विभागाने सुचविलेल्या चार जागांपैकी कुठलीही एक जागा पिटलाईनसाठी निवडावी अशा आषयाची जनहित याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली. न्या. रवींद्र बोर्डे व न्या. अरूण ढवळे यांनी प्रतिवादी रेल्वे मंत्रालयासह रेल्वे बोर्ड व नांदेड विभागास नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. पिटलाईनसाबंठी आैरंगाबाद रेल्वेस्थानकासह चिकलठाणा, नगरसोल आणि करमाड स्थानकांचा प्रस्ताव नांदेड विभागाच्या वतीने रेल्वेमंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. विविध प्रवासी संघटना, एनजीआे, स्थानिक लोकप्रतिनिधी आदींच्या मागणीनुसार नांदेड विभागाने यासंबंधी पाहणी ... ...

‘सीड्स बाँबींग’मुळे वृक्ष लागवड मोहिमेला बळ मिळणार-विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर औरंगाबाद दि. 05 -  शासनाने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. आपल्या जिल्ह्याला 2 कोटी 91 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य दिलेले असताना आपण ते 4 कोटी एवढे वाढवून घेतले आहे. हे उद्दिष्ट्य आपणास साध्य करायचे आहे. ही उद्दिष्ट्यपूर्ती करण्यासाठी ‘सीड्स बाँबींग’ या उपक्रमामुळे वृक्ष लागवड मोहिमेला बळ मिळणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर  यांनी सांगितले.           वन विभाग आणि एअर एलोरा एव्हिएशन या संस्थेमार्फत दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात हेलिकॉप्टरव्दारे सीड्स बंबींगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.           यावेळी डॉ. भापकर म्हणाले की, ज्या ठिकाणी आपण पोहचू शकत नाहीत अशा ठिकाणी सीड्स बंबींग म्हणजेच हवेतून बिया फेकण्याचा  हा उपक्रम देशात पहिलाच असून तो  खरंच खूप कौतुकास पात्र आहे. ... ...

त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वि.ल.धारुरकर औरंगाबाद,दिनांक 5 –विद्यापीठ अनुदान आयोगाचे इमिरट प्रोफेसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख तथा उदार कला व विज्ञान विभागाचे विद्यमान संचालक डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मान्यतेने नुकतीच नियुक्ती झाली आहे. या संदर्भात मनुष्य बळ विकास मंत्रालयाने त्रिपुरा विद्यापीठाच्या कुलसचिवांना कळविले आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव डॉ. धारूरकर यांना आहे. मूळचे उमरगा येथील असलेल्या डॉ. धारूरकर यांनी सुरूवातीला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागात कार्य केले. त्यानंतर नाशिक येथील बिटको महाविद्यालयात इतिहासाचे अध्यापन केले. तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात जनसंवाद व ... ...

हरित औरंगाबादसाठी वृक्षलागवड मोहिमेत सर्वानी सक्रीय सहभाग घ्यावा -हरिभाऊ बागडे औरंगाबाद : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेद्वारा महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार आहे. त्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी ठरवून देण्यात आलेले 44.44 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य करत हरित औरंगाबादसाठी प्रशासन, संस्था, संघटना आणि नागरिक या सर्वांनी वृक्षलागवड मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले. महसूल व वनविभाग, तहसिल कार्यालय व पंचायत समिती, फुलंब्री यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिल कार्यालय, फुलंब्री येथे वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विनायक मेटे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसिलदार संगिता ... ...

डॉ.गंगाधर पानतावणे यांचा पद्मश्री पुरस्कार नातेवाईकांकडे सुपूर्द औरंगाबाद : पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अस्मितादर्श चळवळीचे जनक, ज्येष्ठ विचारवंत, लेखक दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांना शासनाने 25 जानेवारी 2018 रोजी जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या नातेवाईकांकडे आज विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सन्मानपूर्वक सुपूर्द केला. हा पुरस्कार डॉ.पानतावणे यांच्या कन्या नंदिता, निवेदिता यांनी स्वीकारला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते हा पुरस्कार डॉ.पानतावणे यांना 21 मार्च 2018 रोजी वितरीत करण्यात येणार होता. परंतू आजारपणामुळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ.पानतावणे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर 27 मार्च 2018 रोजी त्यांचे निधन झाले. म्हणून हा पुरस्कार स्वत: विभागीय आयुक्त डॉ.भापकर, जिल्हाधिकारी चौधरी यांनी डॉ. पानतावणे यांच्या घरी जाऊन सन्मानाने सुपूर्द केला. सुरूवातीला डॉ.भापकर, श्री.चौधरी ... ...