93व्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची कार्यकारिणी जाहीर स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर उस्मानाबाद – उस्मानाबाद येथे जानेवारी 2020 मध्ये होऊ घातलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाच्या प्रमुख कार्यवाहपदी रवींद्र केसकर, कोषाध्यक्षपदासाठी माधव इंगळे यांच्या नावावर सर्वानुमते मोहर उमटविण्यात आली. ...

भ्रष्टाचार निर्मूलनाचे नाव धारण करणा-या सर्व संस्थांची बरखास्ती उस्मानाबाद : भ्रष्टाचार निर्मूलनाचे नाव धारण करणाऱ्या सर्व संस्थांची बरखास्ती करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन हे राज्य सरकारचे कामच असल्याचं धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केलं. ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ असे नाव कोणतीही संस्था धारण करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलेले असल्यामुळे ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ हे नाव धारण करणाऱ्या सर्व संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. जर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्देश मान्य नाही केले, तर संस्था बरखास्त करणार असल्याचंही धर्मादाय आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. मानवाधिकार हे नाव धारण करणाऱ्या संस्थाही बरखास्त होणार आहेत.  राज्यभरामध्ये या दोनही नावाने रजिस्टर झालेल्या शेकडो संस्था बंद होतील. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन या नोंदणीकृत ... ...

भाजपाचे धस विजयी ,पंकजा मुंडे यांनी मारली बाजी धनंजय मुंडे यांना झटका उस्मानाबाद :बीड--लातूर-उस्मानाबाद  स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस यांचा  विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर मुंडे भगिनींनीच वर्चस्व गाजवल्याची चर्चा सुरू झाली आहे.विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जोरदार झटका बसला आहे .  ...

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा - पालकमंत्री अर्जुन खोतकर उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर व जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज सकाळी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा करून संपूर्ण जिल्ह्यात वादळ, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबतची माहिती घेतली. जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत व आवश्यक ती मदत करण्याबाबत पालकमंत्री श्री.खोतकर यांनी जिल्हाधिकारी श्री.गमे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मुख्यतः तुळजापुर क्षेत्रातील झालेल्या नुकसानीची शासनाकडून नोंद घेऊन मदत करण्याबाबत सूचना श्री.खोतकर यांनी केल्या आहेत. ...

पोलीस दलाने आयएसओ मानांकन मिळवणे ही अभिमानाची गोष्ट - पोलीस महानिरीक्षक भारंबे उस्मानाबाद :- पोलीस दलाचे काम हे खूप ताण-तणावाचे काम आहे, कामाचा भार सांभाळून आयएसओ मानांकन मिळवणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढले. येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयएसओ प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. उस्मानाबादमध्ये ही गोष्ट घडणे ही खूप मोठी बाब आहे, दैनंदिन ताणतणाव असताना संघटितपणे काम करणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. एका ध्येयासाठी सर्वांना प्रेरित करून ध्येय साध्य केले, त्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे त्यांनी अभिनंदन केले. जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी आपण काही मापदंड आखले पाहिजेत, त्यानुसार प्रयत्न करून यश मिळवावे. या प्रयत्नांना आयएसओ मानांकन मिळणे हे उत्साहवर्धक आहे. सकारात्मक सेवाभाव मनावर बिंबवून ते आचरणात आणावे असे ते म्हणाले. या वेळी जिल्हाधिकारी ... ...

एकलव्य विद्या संकुल प्रकल्पासाठी राज्य शासनातर्फे दोन कोटींचा निधी - मुख्यमंत्री यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ   उस्मानाबाद, दि.13 :- समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या एकलव्य विद्या संकुलामार्फत करण्यात येत आहे. या प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.   तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुल येथे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक, ... ...

तुळजापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्रीतुळजाभवानीचे दर्शन उस्मानाबाद, दि. 13 :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्रीतुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.   यावेळी राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे उपस्थित होते. ...