लातूरच्या विकासाचा नवा पॅटर्न तयार करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर रेल्वे कोच फॅक्टरीच्या भूमिपूजनाचा संस्मरणीय सोहळा   लातूर दि. 31:- लातूरच्या परीक्षेचा पॅटर्न देशभर प्रसिध्द आहे. हा पॅटर्न तुम्ही तयार केला आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लातूरचा विकासाचा पॅटर्न तयार करुन लातूरचे नाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर झळकावणार. रेल्वेच्या या मेट्रो रेल्वे कोच फॅक्टरीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून काही हजार हाताना काम मिळणार आहे. युवकांचे स्थलांतर थांबणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.    ...

जलयुक्तच्या कामामूळे लातूर जिल्हा टँकरमूक्त झाला -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर  निलंगा, देवणी व शिरुर अनंतपाळ तालूक्यातील 17 गावांत 25 सिमेंट  नाल्याच्या कामांचे भुमीपूजन  रांजणगाव येथील फियाट कंपनीने 3 कोटीचा निधी या कामासाठी दिला लातूर,दि. 18: लातूर जिल्हयात सततच्या दुष्काळी परिस्थीतीमूळे पाणी टंचाई निर्माण झालेली होती. परंतू सन 2014-15 पासून जिल्हयात जलयूक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याने पावसाचे पाणी मोठया प्रमाणावर आडविले गेले. त्यामूळे जिल्हयाची एकुण भूजलपातळीत मोठी वाढ झाली व जिल्हयात सर्वत्र पाण्याची उपलब्धता झाल्याने जिल्हा टँकरमूक्त झाला व भविष्यात ही लातूर जिल्हा टँकरमूक्त राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कामगार कल्याण कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. निलंगा तालूक्यातील हंगरगा (शिर्शी) येथे रांजणगाव येथील फियाट ऑटोमोबाईल्स कंपनीने सामाजीक ... ...

गारपीटग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही लातूर, दि. १५ : राज्यात प्रथमच दोन दिवसात  गारपीटग्रस्थ शेतीचे पंचनामे पूर्ण केले असून गारपीटग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती लातूर विमानतळावर पत्रकाराशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन व बीडकडे प्रयाण झाले. लातूर विमानतळावर पुण्याहून आगमन झाल्यावर पत्रकारांशी औपचारिकपणे बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  त्यांच्या सोबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे होत्या.   लातूरचे पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर सुरेश पवार, आमदार विनायकराव पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,जिल्हा ... ...

समाजाच्या शाश्वत आरोग्यासाठी शासन प्रयत्नशील - केंद्रीय आरोग्य मंत्री  नड्डा   लातूर येथे लिनिअर ॲक्सलरेटर या अत्याधुनिक उपरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न   लातूर,दि. 11:- आरोग्याच्या सुविधा विषयक केलेले कार्य हे चिरकाल टिकणारे कार्य असून व्यक्तीला आजारातून मुक्त करण्याबरोबरच भविष्यात आजारच उद्भवू नयेत यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केले.   विवेकानंद कॅन्सर रुग्णालयात कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार यंत्र लिनिअर ॲक्सलरेटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्री. नड्डा बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार गोपालराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. ... ...

धनगर आरक्षण अहवाल अंतिम टप्प्यात : आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी शासन प्रयत्नशील - जलसंधारण मंत्री राम शिंदे लातूर येथे दुसरे आदिवासी साहित्य संमेलनास सुरुवात   लातूर, दि. 10: धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स संस्थेमार्फत राज्य शासनाने सर्वेक्षण केलेले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून हे आरक्षण कोर्टात टिकून त्याचा लाभ धनगर समाजाला मिळाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहिती मृद व जनसंधारण, राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.   धनगर साहित्य परिषदेमार्फत लातूर येथे आयोजित दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात जलसंधारणमंत्री श्री. शिंदे बोलत होते.  यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती संगीता धायगुडे, उद्घाटक ... ...

राज्य शासनाकडून 77 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी - पालकमंत्री संभाजी निलंगेकर ऑगस्ट 2019 पर्यंत राज्य मोतीबिंदू मुक्त होणार राज्यात जलयुक्त अंतर्गत 11 हजार 493 गावे टंचाईमुक्त. दिव्यांगांना 100 टक्के साहित्य वाटप, मोतीबिंदुमुक्त व कॅन्सरमुक्त अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी हासोरी ता. निलंगा येथे सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच सुरू होणार जिल्हा प्रशासन सामाजिक बांधिलकीतून स्वदेश हा उपक्रम राबवित आहे लातूर : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यातील 77 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येऊन कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही 25 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 192 शेतकऱ्यांना 31 डिसेंबर 2017 अखेरपर्यंत 252 ... ...

नागरिकांनी सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातूर : प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही जाती-पंथाचा विचार न करता प्रथम आपण या देशाचे नागरिक आहोत ही भावना ठेवून सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे. भारत देश हाच आपला धर्म मानला पाहिजे, असे प्रतिपादन कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. मारवाडी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी आदिसह इतर मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. निलंगेकर पुढे म्हणाले की, आपण सर्वजण प्रथम भारत ... ...