बीड जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 300 कोटी रुपयांच्या  आराखड्यास मान्यता औरंगाबाद, दिनांक 30  :- बीड जिल्ह्याचा सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 300  कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) राज्सस्तरीय आराखडा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सर्वश्री विक्रम काळे, प्रकाश ... ...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाने दृष्टीहीन व्यक्तिंना एक लाखाचे अर्थसहाय्य बीड : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते साक्षाळ पिंप्री येथील दृष्टीहीन पाच व्यक्तिंना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन मडावी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके आदि उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी बीड येथील शासकीय विश्रामगृहात दोन कुटुंबातील दृष्टीहीन व्यक्तिंनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी अपंग कल्याण निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचे त्यांनी सूचित केले होते. अवघ्या दोन दिवसात समाज कल्याण विभागामार्फत या आदेशाची अंमलबजावणी होत त्या व्यक्तिंना एक लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात ... ...

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा बीड : बीड जिल्ह्याचा कृषि, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्रीडा आदि विविध क्षेत्रांत चौफेर विकास होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असा विश्वास देत जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करुया, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदि उपस्थित ... ...

भाजपच्या कोअर कमिटीतून पंकजा बाहेर बीड: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (गुरुवार) गोपीनाथ गडावरुन एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. कारण आजच्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपली खदखद थेट व्यक्त केली. याचवेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. 'मी भाजपच्या कोअर कमिटीत यापुढे नसेन. मला पक्षाने कोअर कमिटीतून मुक्त करावं. मी पक्ष सोडणार नाही. पण गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी आता थेट जनतेमध्ये जाणार असून त्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणार.' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  'माझ्यावर असा आरोप झाला की, मी एखादं पद मिळविण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत आहे. त्यामुळेच आता माझ्याकडे कोअर कमिटीचं असणारं सदस्य पद देखील मी सोडत आहे.' असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये थेट उभी फूट पडली असल्याचं दिसून येत आहे. पराभव वैगेरे चिल्लर गोष्टीनं खचणार नाही, मात्र गेल्या काही दिवसांत १५ वर्षांच्या राजकीय ... ...

माझा भरवसा धरू नका-एकनाथ खडसे बीड:भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टीका केली. पण याच वेळेस त्यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य देखील केलं. 'पंकजाताई पक्ष सोडणार नाही पण आता माझा काही भरवसा धरु नका' असं म्हणत खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.  गोपीनाथ मुंडें असताना भाजपमध्ये लोकशाही पद्धतीने निर्णय व्हायचे. असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एकाधिकारशाहीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. 'पक्ष सोडून गेलं पाहिजे असी वागणूक आमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पक्षात दिली गेली. पण फडणवीस यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मुंडे साहेबांमुळेच फडणवीस २०१४ मध्ये प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यावेळी त्यासाठी माझी देखील संमती घेण्यात आली होती. ज्यामुळे ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.' अशा शब्दात खडसेंनी फडणवीसांबाबतची नाराजी व्यक्त केली.  याचवेळी एकनाथ खडसेंनी ... ...

अनोख्या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत स्वतंत्र वीज रोहित्र पोहोचविणार - पालकमंत्री पंकजा मुंडे   बीड : राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून उच्च दाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी स्वतंत्र रोहित्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून 188 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे, याअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वीज रोहित्र दिले जाते, असे प्रतिपादन पालकमंत्री  पंकजा मुंडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने आयोजित  एक शेतकरी एक डीपी योजनेच्या जिल्ह्यातील शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. परळी तालुक्याच्या पांगरी गावातील विष्णू नागोराव पांचाळ या अल्पभूधारक शेतकऱ्यास शासनाच्यावतीने बसविण्यात आलेला 10 केवी क्षमतेच्या उच्चदाब रोहित्राचे उद्घाटन श्रीमती  मुंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, महावितरणचे लातूर ... ...

बीडमध्ये सगळ्या जागेवर भगवा पाहिजे बीड:‘जनतेने सरकारच्या दारात नव्हे तर सरकारने जनतेच्या दारात आले पाहिजे हा शिवसेनाप्रमुखांचा दंडक होता. ही खरी लोकशाही, ही खरी शिवशाही, तीच लोकशाही मला अभिप्रेत आहे. थापाडे सरकार आता नको, तुमच्यासाठी, महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी रयतेचे राज्य आले पाहिजे. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सत्तेसाठी वापर करणाऱ्यांना रयतेच्या राज्याचा विसर पडला आहे. शिवसैनिकांनो वङ्कामुठ आवळा. घराघरात, गावागावात जा. थापाड्या सरकारचे कारनामे सांगा, जे जाहिरातीत सांगितले होते ते तुमच्या पदरात पडले का हे विचारा. बस्स झाले आता. 2019 चा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, महाराष्ट्राच्या विधीमंडळावरच काय दिल्लीच्या तख्तावरही शिवसेनेचा भगवा फडकेल असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये व्यक्त केला. सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच, उद्धव ठाकरे यांनी ... ...