मराठवाड्याला आणखी ५० टी.एम.सी. पाणी,५० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार-मुख्यमंत्री फडणवीस १ लाख कोटी रुपयांची कामे मराठवाड्याच्या विकासासाठी -गडकरी नांदेड, दि. १९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साडेतीन वर्षातील कार्यकाळात राज्यात 15 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. सरकारचा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे रस्ते, वीज, पाणी या विषयांना प्राधान्य देण्यात येत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  पाणी, रस्ते या कामात राज्याला भरीव मदत केली आहे. रस्ते हे विकासाचे महामार्ग आहेत, हे ओळखून त्यांनी राज्यात सुरु केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहा येथे केले.   भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण अंतर्गत औसा-चाकूर या ५५ कि.मी., चाकूर-लोहा या ११४ कि.मी. व  लोहा - वारंगा १८७ कि.मी. रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे तसेच ... ...

कर्तृत्ववान महिलांचा 8 रोजी विशेष सन्मान नांदेड-जागतीक महिला दिनी आपल्या कार्य कौशल्याने इतरांना प्रोत्साहित करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा दि.8 मार्च 2018 रोजी सायंकाळी 6 वा. कुसूम सभागृह, नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात येणार आहे. मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा व मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, ह्युमन राईट्स फाऊंडेशनच्यावतीने  जागतीक महिला दिनी दरवर्षी आपल्या कार्य कुशलतेने नावलौकीक करून इतरांसाठी मार्गदर्शक व प्रोत्साहित ठरणार्‍या नामांकीत कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात येतो. यावर्षी मातोश्री इंजनिअरिंग कॉलेजच्या डीन साधना चिद्रावार, विविध प्रश्नावर आंदोलन करणार्‍या सुरेखा रावणगांवकर, सुधा देवशेटवार, शैक्षणीक क्षेत्रातील प्रा.डॉ.संगीता घुगे, हदगाव येथे रूग्णांची सेवा करणार्‍या डॉ.जयश्री पवार, शिक्षणातून प्रबोधन करणार्‍या प्रा.जानका पाटील पांडूर्णे, अनेक पुरस्कार प्राप्त सविता दादज्वार, कोचिंग ... ...

कृषी विज्ञान केंद्रांनी शेतक-यांचे जीवन समृद्ध करावे - राज्यपाल चे. विद्यासागर राव नांदेड : 'कृषीवेद' या नूतन इमारतीचे व कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन नांदेड, दि. 12 :- शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून आणि शेतीमधील नवनवीन बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध केले पाहिजे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.   केंद्र शासनाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेंतर्गत आणि सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या "कृषीवेद" या नूतन इमारतीचे तसेच कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सगरोळी ता. बिलोली येथे झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू, ... ...

गाव समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर - राज्यपाल चे. विद्यासागर राव दत्तक घेतलेल्या नांदेड जिल्ह्यातील जावरला गावाला राज्यपालांची भेट   नांदेड, दि. 11 :-  दत्तक घेतलेल्या जावरला ता. किनवट या गावाला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विकास कामांचे उद्घाटन केले. गावकऱ्यांशी संवाद साधताना जावरला गावाच्या समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   राज्यपाल चे. विद्यासागर राव यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले की, आदिवासी भागातील गावांच्या विकासाकडे सर्वांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. जावरला हे गाव दत्तक घेतल्यानंतर विकासाभिमूख होत असून येथील ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचे आपले प्रयत्न राहणार आहेत. या परिसरातील जवळपास 2 हजार एकर पर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती ... ...

विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान देण्यासाठी सज्ज रहावे -  विद्यासागर राव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा 20 वा दीक्षांत समारंभ नांदेड, दि. 11 :- विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी देता येईल, ते योगदान देण्यासाठी सदैव सज्ज रहावे. सत्यनिष्ठा आणि देशाप्रती जाणीव जागृत ठेऊन काम केल्यास स्वतः बरोबरच राष्ट्राची प्रगती साधता येईल. तसेच कोणत्याही प्रकारचा जाती, धर्म, पंथ व भेदभावाचा विचार न करता समता, बंधुता आणि एकता या तत्त्वाप्रती तसेच माता-पित्यांप्रती आदर ठेवावा, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन केले.      विद्यापीठाच्या प्रांगणात दीक्षांत प्रदानाचा शानदार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख ... ...

आयपीएस अडकला लाचेच्या जाळ्यात नांदेड – घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. यासाठी तु 2 लाख रुपये दे अशी मागणी तत्कालीन प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकृष्णन यादव यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी दि.30 रोज मंगळवारी अमरावती लाचलुचपत विभागाने नांदेड येथे त्यांच्या खाजगी सहकाऱ्याला 1 लाख रुपयाची लाच देतांना रंगेहात पकडले. भारताच्या सर्वसामान्य माणसाचे भले करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेच्या माध्यमातून आयपीएस झालेल्या एका उदंड युवकाने आज एका खाजगी माणसामार्फत लाचेची जूनी वसुली बाबत स्विकारलेल्या 1 लाख प्र्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या लाचलुचपत विभागाने नांदेडमध्ये कार्यवाही करून त्या खाजगी इसमाला जेरबंद केले आहे. आयपीएस मात्र सध्या हैद्राबादमध्ये प्रशिक्षण घेत आहे. जी.विजयकृष्णन यादव हे मुळ राहणारे तेलंगणा राज्यातील आहेत. सन 2015 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आयपीएस ग्रेड मिळविणाऱ्या आणि सध्या नांदेडच्या इतवारा उपविभागात कार्यरत असणाऱ्या  जी.विजयकृष्णन यादव ... ...

लोह्याच्या विकासात माणिकराव पाटील यांचे मोठे योगदान – जयंतीनिमित्त कार्याचा गौरव लोहा - लोहा शहर व तालुक्याच्या विकासात पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांचे मोठे योगदान असून सामाजिक समता शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार करत त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले चारशे कुटूंबीयांचा पोशिंदा आणि शहराच्या वैभवाचा पाया घालणाऱ्या माणिकराव पाटलांच्या विचारांचे आत्मसात नव्या पिढीने केले पाहीजे असा भावना  मान्यवरांनी भाषणातून व्यक्त  केल्या. लोह्यातील शिवछत्रपती विद्यालययात लोह्याचे पहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या जयंती निमित शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेचे सचिव ऑड के. एम. पवार, कृउबा संचालक केशवराव मुकदम, उपजिल्हाप्रमुख शरद पवार, डॉ.धनंजय पवार, नामदेव पाटील, श्रीकांत पवार, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माऊली पावर, अप्पाराव पवार, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. ई. वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हनमंत पवार, भास्कर पाटील पवार, ... ...