परभणी जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 262 कोटीं रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता औरंगाबाद, दिनांक 30  :- परभणी जिल्ह्याचा सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 262 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्याक विकास, औकाफ, कौशल्यविकास मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) राज्सस्तरीय आराखडा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार संजय ... ...

प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडल्यास लोकशाही बळकट होईल    - पालकमंत्री नवाब मलिक परभणी, दि.26 :- भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहेत. संविधानाशी बांधिलकी रहावी आणि नागरिकांमध्ये संविधानाप्रती जनजागृती निर्माण व्हावी हा हेतु समोर ठेवून आजपासुन ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. तरी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडल्यास लोकशाही बळकट होईल. असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, महापौर श्रीमती अनिताताई रविंद्र सोनकांबळे, खासदार ... ...

परभणी जिल्ह्याच्या 219 कोटीच्या  जिल्हा वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करणार- पालकमंत्री नवाब मलिक परभणी, दि. 25 :- परभणी जिल्ह्याच्या सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 219.2 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास अल्पसंख्याक व औकाफ, कौशल्य विकास मंत्री तथा परभणी जिल्हाचे पालकमंत्री  नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढविण्यासाठी वित्त मंत्री यांच्याकडे वाढीव निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री मलिक यांनी यावेळी सांगितले.             जिल्हा वार्षीक नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री.मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., यांनी प्रास्ताविक करुन बैठकीबाबत माहिती दिली. जिल्हा ... ...

मनपाच्या वतीने बी. रघुनाथ स्मृतीदिन साजरा परभणी ः शहर महापालिकेच्यावतीने बी. रघुनाथ स्मृती दिनानिमित्ताने आज दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. वसमत रस्त्यावरील बी. रघुनाथ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास महापौर मिनाताई वरपुडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मनपा गटनेते  मंगला मुद्गलकर, आरोग्य सभापती सचिन देशमुख, सिनेगायक उदय वाईकर, संकीर्ण विभाग प्रमुख राजकुमार जाधव, रमेश चव्हाण, बी. रघुनाथ सभागृह व्यवस्थापक केशव पैके, भांडार विभागाचे लिपिक सुभाष खुळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी गायक वाईकर यांनी  बी. रघुनाथ यांची, आज कुणाला गावे ही कविता गाऊन आदरांजली वाहीली.   ...

परभणीत लवकरच मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह - लोणीकर परभणी : मराठा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरामध्ये एकूण 200 मुले व दीडशे मुलींसाठी महिनाभरात वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले. शासनाने डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विस्तारित योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती त्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.लोणीकर यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भेट दिली यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांचेसह विद्यापीठामधील इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. श्री.लोणीकर म्हणाले विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा न होता काही इमारती तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करून तात्काळ मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ... ...

विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी येथे विविध विकासकामांचे ई-भुमिपुजन, लोकार्पण सोहळा   परभणी, दि. १९ : राज्यातील रस्ते विकासासाठी आत्तापर्यंत 5 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गेल्या 67 वर्षात केवळ 5 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग झाले हेाते मात्र गेल्या साडेतीन वर्षांत 15 हजार किमीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी काही रस्त्यांची कामे सुरू झाली असून उर्वरित कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू असून राज्याच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.   परभणी येथे विविध विकासकामांचे ई-भुमिपुजन, लोकार्पण सोहळा व विस्तारित समाधान योजनेच्या समारोप प्रसंगी ते बोलत हेाते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक ... ...

आयुष्यमान भारत उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारतीयांना आरोग्य सेवा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी, दि. 19 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत हा उपक्रम सुरु करुन या उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारतीयांना 5 लक्ष रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन दिल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   डॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.   व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, जहाजबांधणी व जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परभणीचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर, कामगार ... ...