जायकवाडीत सोडणार ९ टी.एम.सी पाणी औरंगाबाद: जायकवाडी धरणामध्ये वरच्या धरणांतून त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी सूचना जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिली. त्यानंतर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व खोऱ्यातील जलाशयामधून जवळपास ९ टीएमसी पाणी येणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही कार्यवाही करण्यात आली. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सुरु करा,असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला सोमवारी सुनावले. त्यानंतर जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व खोऱ्यातील जलाशयांतून जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येणार ? >मुळा        १.९० टीएमसी >प्रवरा        ३.८५ ... ...

पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे विसर्जन हौदात ,सरस्वती भुवनचा उपक्रम  औरंगाबाद :श्री सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय व श्री सरस्वती भुवन  महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृह औरंगाबाद,यांच्यातर्फे यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.सर्वत्र पीओपीच्या गणेश मूर्ती वापरण्यात येतात याचा पर्यावरणावर परिणाम होतो म्हणून गणेश विसर्जन सरस्वती भुवन मुलांच्या वसतिगृहात हौदात करण्यात आले यासाठी हौदामध्ये अमोनियम बायकार्बोनेट टाकण्यात आले त्यामुळे विसर्जन केलेली केलेली  मूर्ती 48 तासात पाण्यात विरघळते  हौदाच्या तळाशी कॅल्शियम कार्बोनेट चा थर जमा होईल  हे तयार झालेले द्रावण दोन दिवस बाजूला ठेवले म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट चा थर पाण्यापासून वेगळा होईल मूर्ती विरघळून पाण्यात तयार झालेले पाणी म्हणजेच अमोनियम सल्फेट या द्रावणात पाच पट पाणी मिसळल्यास ते झाडांना आणि कुंड्यांना खत म्हणून घालता येईल व जी पावडर तयार होईल त्यापासून खडू तयार ... ...

दाभोळकरांचा मारेकरी औरंगाबादचा   मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबाद येथून सचिन अंधुरे नामक व्यक्तीला अटक केली आहे.   सचिनला एटीएसने आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. सचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती एटीएसने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपणार असून या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले. औरंगाबाद शहरात खळबळ       औरंगाबाद: एटीएसने आणि सीबीआयने औरंगाबाद ... ...

मराठा आरक्षणासाठी  दोघांची आत्महत्या औरंगाबाद :मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. रविवारी  परभणीतील सेलू तालुक्यातील दिग्रसवाडी येथे एकाने पेटून घेतले.तर रविवारी नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी सेलूच्या तरुणाने पेटवून घेतले परभणी : मराठा आरक्षणाला विलंब होत असल्याने सेलू तालुक्यातील डिग्रस वाडी येथे उच्चशिक्षित तरुणाने पेटवुन घेवुन आपली जीवन यात्रा संपविली आहे. रविवारी (५ जुलै) सकाळी 10 वाजेच्या सुमारास डिग्रसवाडी येथील तरुण अनंत सुंदरराव लेवडे (वय 24) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना फेसबुक खात्यावरुन पोस्ट करुन गावाजवळील उजव्या कालव्याच्या बाजुच्या शेतात अंगावर राँकेल ओतुन पेटवुन घेतले. यात लेवडे जागीच मरण पावले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यांनी लेखी अश्वासन देवुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मयताच्या कुटुंबास 10 लाख ... ...

मराठवाड्यात 75 हजार कोटी रुपयांची  रस्ते व सिंचनाची कामे होणार - नितीन गडकरी       ...

मराठा क्रांती ठोक मोर्चाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगांव टोका येथील गोदावरी पात्रात काकासाहेब शिंदे या तरूणाने उडी घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विरोधा मराठा क्रांती मोर्चाने  मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  रात्री आठ वाजता क्रांतीचौक येथील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. याआधी 9 ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आज (ता.23) दुपारी कायगांव टोका येथील गोदावरी पात्रात कानडगांवच्या काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेत जलसमाधी घेतली. मंगळवारी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद अत्यंत शांततेत पाळण्यात येईल. सार्वजनिक परिवहन सेवा, रुग्णवाहिका तसेच अन्य अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात येतील, असे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर राज्यभर उद्रेक ... ...

मराठा आरक्षणासाठी तरुणाने गोदावरीत उडी घेतली गंगापूर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला गंगापुरात हिंसक वळण लागले. या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून थेट गोदावरी पात्रात उडी घेतली. पात्रात जीवरक्षक नसल्यामुळे अवघ्या काही मिनिटात त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले असून अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी नगररोडवर रास्ता रोको सुरू केल्याने दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत आंदोलकांनी मृतदेह गंगापूरच्या पोलीस ठाण्यात आणला असून मुख्यमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव वाढला आहे. शिवसैनिक असलेले काकासाहेब शिंदे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सुरुवातीपासून आघाडीवर होते. आरक्षणाच्या मागणीसाठी परळी येथे सात ... ...