औरंगाबाद आणि जालना उद्योगांचे भावी मॅग्नेट - मुख्यमंत्री फडणवीस सिरसवाडी येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे भूमिपूजन जालना, दि. ४ –देशातील सर्वोत्तम इंडस्ट्रियल पार्क म्हणून शेंद्रा-बिडकीन उदयास येत आहे.  तसेच जालना येथे ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत असून या ड्रायपोर्टमुळे मराठवाड्यातील उद्योजकांना त्यांचा माल सहजपणे आयात व निर्यात करता येणार आहे.  तसेच समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा माल कमी वेळेत जेएनपीटीपर्यंत पोहोचण्यास मदत होऊन यामुळे उद्योजकांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार असल्याने उद्योगाचे भावी मॅग्नेट औरंगाबाद आणि जालना राहणार असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस  फडणवीस यांनी केले.   सिरसवाडी येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ... ...

महाराष्ट्राच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना, दि. ४ : महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असून नागरिकांच्या आर्थिक गरजा  पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.   यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदी उपस्थित होते.   ...

बाळासाहेब पवार म्हणजे सहकार, शिक्षण क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणारे व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळासाहेब पवार यांच्यावरील नीतिधुरंधर या चरित्रग्रंथाचे प्रकाशन  औरंगाबाद : ‘नीतिधुरंधर’ या चरित्रग्रंथाचे वाचन केल्यावर बाळासाहेब पवार हे सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी वृत्तीने काम करणारे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीचा अवलंब अनेकांनी करावा असं ते व्यक्तिमत्व होतं, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.   मराठवाड्यातील समाजकारण व राजकारणातील अद्वितीय व्यक्तिमत्व बाळासाहेब पवार यांच्या नीतिधुरंधर या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा ... ...

शेगाव-पंढरपूर, दिंडी मार्गाची लोणीकरांनी केली पाहणी जालना : विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत कमी वेळात पोहोचता यावे यासाठी शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-मंठा -परतूर-आष्टी -लोणी -माजलगाव तसेच वाटूर-मंठा -परभणी या महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाला अधिक गती देण्यासाठी व विविध अडचणी दूर करण्यासाठी आज दिनांक २१ रोजी पालकमंत्री बबनराव लोणीकर बबनराव लोणीकर यांनी आष्टी ते परतवाडी दरम्यान रस्त्याच्या कामास अचानक भेट देऊन पाहणी केली. काम दर्जेदार पद्धतीने करण्याची सूचना श्री.लोणीकर यांनी कंत्राटदारास केली. शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग दोन हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार आहे. परतूर मतदारसंघात या रस्त्याची लांबी ९५ किमी आहे ह्या रस्त्याचे काम मेगा इंजिनियरिंग व इन्फ्रा कंपनी हैद्राबाद याना देण्यात आले असून त्यांचे काम ऑगस्ट २०१७ ला सुरु झाले असून हा संपूर्ण रस्ता त्यांना ३० महिन्यात ... ...

मराठवाड्यात रेशीम उद्योगाला चालना देणार- अर्जुनराव खोतकर जालना : कमी पाणी, अल्प गुंतवणूक व कमी कालावधीमध्ये भरघोस उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिले जाते. येणाऱ्या काळात मराठवाड्यासह राज्यात रेशीम उद्योगाला अधिक गतीने चालना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योग, पदुम राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीमध्ये प्रायोगिक तत्वावरील रेशीम कोष बाजारपेठेचे उद्घाटन राज्यमंत्री श्री.खोतकर यांच्या हस्ते फित कापून तसेच कोषांची खरेदी करुन आज दि. 21 एप्रिल रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, माजी आमदार संतोष सांबरे, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणी, भास्कर आंबेकर, पांडूरंग डोंगरे, भानुदास घुगे, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय कदम, उपसंचालक ... ...

घनसावंगी मतदारसंघातील पैठण-पाचोड-घनसावंगी व जालना-घनसावंगी रस्त्याचे नुतनीकरण होणार – पालकमंत्री जालना : घनसावंगी मतदार संघातील रस्त्याची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे जवळपास मागील २० वर्षांपासून कोणताही मोठा रस्ता किंवा रस्त्याचे नूतनीकरण झालेले नव्हते अशातच पाचोड-अंबड-घनसावनगी-कु.पिंपळगाव-आष्टी व जालना-गाढेसावरगाव-घनसावंगी या रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे रस्त्याचे नुतनीकरणाचे काम करावे अशी मागणी या भागातील लोकांची होती. पालकमंत्री श्री.लोणीकरांच्या प्रयत्नातून या दोन्ही रस्त्याच्या नुतनीकरणाला मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती श्री.लोणीकरांनी दिली आहे. श्री.लोणीकर म्हणाले की, जनतेच्या मागणीचा व आग्रहाचा विचार करून हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत दोन्ही रस्त्याच्या नुतनीकरणासाठी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचेकडे पाठपुरावा करून निधी ... ...

शेतक-यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात शेतकरी उद्योजक  होण्याच्या वाटा होणार प्रशस्त; प्रस्ताव सादर करण्याचे अर्थमंत्र्यांचे आदेश जालना, दि. २० :  शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत आहे. या माध्यमातून शेतकरी  उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्‍त होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.   अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रुर्बन व मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित ... ...