Breaking News

विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधण्यात इस्रोला यश

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 07:15:57 pm
  • 5 comments

विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधण्यात इस्रोला यश

बंगळुरू : चांद्रयान दोन मोहिमेतील लॅंडर विक्रमचा ठावठिकाणा समजला असून त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के शिवन यांनी रविवारी दिली.

आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर बिक्रम लॅंडरचा शोध घेण्यात यशस्वी झालो आहोत. त्याचे बहुदा हार्ड लॅंडिंग झाले असावे. मात्र त्यात त्याचे काय नुकसान झाले याची माहिती आम्हाला नाही. त्याच्याशी संपर्क सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी दोन आठवडे ते सुरूच ठेवण्यात येतील.विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठावर उतरविणे हा चांद्रयान २ मोहिमेतील महत्वाचा टप्पा होता. ७ तारखेला विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठावर उतरणे अपेक्षित होते परंतु चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला. यामुळे शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशवासीय निराश झाले. परंतु एक दोन दिवसात इस्रो विक्रम लँडरचे ठिकाण शोधून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल असेही डॉ. सिवन यांनी सांगितले होते. ऑर्बिटरने विक्रम लँडरच्या थर्मल इमेज देखील पाठवल्या आहेत. ऑप्टिकल इमेजमधून विक्रम लँडरची कोणत्याही प्रकारची मोडतोड झाली नसल्याचेही दिसून आले आहे, त्यामुळे आता जर पुन्हा त्याच्याशी संपर्क झाल्यास विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठावर उतरविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असेही डॉ. सिवन यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांसह देशवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

 

Best Reader's Review