Breaking News

रिलायन्स जिओने आता टीव्हीही केला लाँच; दुसरा फोनही भेटीला येणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 06-07-2018 | 12:20:53 am
  • 5 comments

रिलायन्स जिओने आता टीव्हीही केला

लाँच; दुसरा फोनही भेटीला येणार

मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने तंत्रज्ञान क्षेत्रात आता आणखी एक नवे पाऊल टाकले असून जिओ फोननंतर आता रिलायन्सचा जिओचा टी.व्ही. लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. नेटवर्क कनेक्टिंग, व्हिडिओ कॉन्फरन्स आणि वॉईस कमांडसह अनेक अत्याधुनिक सुविधा या टीव्हीमध्ये असणार असून याबरोबर रिलायन्स जिओचा सेटॉप बॉक्स आणि नवीन मोबाईल बाजारात येणार असल्याची घोषणा कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी केली आहे.

यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह ईशा आणि आकाश यांनी जिओ 2 फोन लाँच केला. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध असेल.  जिओ फोन 2 सह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच करण्यात आलं.  यावेळी मुकेश अंबानी यांनी महत्त्वाची गिगा टीव्हीबाबतची घोषणा केली. शिवाय गिगा फायबर ब्रॉडबॅण्ड, राऊटरही लाँच केला. जिओच्या गिगा टीव्हीमध्ये व्हॉईस कमांड असेल. टीव्हीच्या सेट टॉपबॉक्समध्ये सर्व भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांड असतील.

Jio हे भारतातील सर्वात वेगवान नेटवर्क आहे, देशाचा प्रत्येक कोपरा Jio ने जोडणार आहे, जियो ‘फिक्सड लाइन ब्रॉडबँड’चे क्षेत्र विस्तारणार असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. यावेळी मुकेश अंबानी यांनी 2018 हे आर्थिक वर्ष रिलायन्स उद्योग समुहासाठी खास असल्याचे सांगितले.  या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 20.6 % वाढून 36,076 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले.

अंबानी म्हणाले, रिलायन्स जिओचे सध्या 22 कोटी ग्राहक आहेत. महिन्याला जिओचा 240 कोटी GB पेक्षा जास्त डेटा वापरला जातो. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासह ईशा आणि आकाश यांनी जिओ 2 फोन लाँच केला. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध असेल.  जिओ फोन 2 सह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच करण्यात आलं.

आता आपल्या घरातील फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालतील. जिओ स्मार्ट होम सोल्यूशनची सेवा 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याचाच अर्थ तुमच्या घरातील टीव्ही, कॅमेरा, प्लग्ज दरवाजे इत्यादी तुमच्या आवाजानेच कंट्रोल होतील. हे सगळं जिओ अॅपद्वारे शक्य आहे.

Best Reader's Review