Breaking News
लोणार सरोवराची माहिती आता ई-बुकच्या स्वरुपात; पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ई – बुकचे प्रकाशन
- Post By आज दिनांक वेब टीम | Sun 10-06-2018 | 05:44:25 pm
- 5 comments
लोणार सरोवराची माहिती
आता ई-बुकच्या स्वरुपात
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ई – बुकचे प्रकाशन
मुंबई, दि. ८ : बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे तयार झालेल्या तसेच खारे पाणी असलेल्या जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराची इत्यंभूत माहिती आता ई – बुकच्या स्वरुपात उपलब्ध करण्यात आली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज याचे प्रकाशन करण्यात आले.
हे ई – बुक एमटीडीसीच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या ई-बुकमध्ये लोणार सरोवराची वैज्ञानिक माहिती, परिसरातील पर्यटनस्थळे, या सरोवरापर्यंत कसे पोहोचावे त्याची माहिती, परिसरात उपलब्ध असलेल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टस् ची माहिती देण्यात आली आहे.
मंत्रालयात झालेल्या ई-बुक प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.