Breaking News

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हाच – उच्च न्यायालय

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 12-05-2018 | 05:08:08 am
  • 5 comments

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

फॉरवर्ड करणे गुन्हाच – उच्च न्यायालय

चेन्नई : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणे किंवा तशा पोस्ट लिहिणे हा गुन्हाच ठरणार आहे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. २० एप्रिल रोजी भाजपा नेता एस. व्ही. शेखर यांनी महिला पत्रकारांबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक पेजवर लिहिली होती. या प्रकरणी एस. व्ही. शेखरना जामीन नाकारत मद्रास उच्च न्यायालयाने फेसबुक असो किंवा इतर सोशल मीडिया त्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे किंवा फॉरवर्ड करणे गुन्हाच आहे असे म्हटले आहे.

एकाही माणसाला महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य पोस्ट करण्याचा हक्क नाही. जर त्या माणासाने असे केले किंवा कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट केली तर तो गुन्हाच ठरणार आहे. असंसदीय शब्द वापरुन महिलांची बदनामी करणे हे जास्त खटकणारे आहे असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

एखाद्या कृतीपेक्षा शब्द जास्त परिणामकारक ठरतात. जेव्हा एखादी व्यक्ती राजकीय किंवा समाजातील महत्त्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती असते तेव्हा त्याने केलेल्या पोस्टवर लोक विश्वास ठेवू लागतात. काय म्हटले गेले आहे हे महत्त्वाचे आहे, मात्र त्याचसोबत ते कोणी म्हटले आहे ते पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या सेलिब्रिटीने आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्या तर त्यातून समाजात चुकीचा संदेश जातो असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Best Reader's Review