Breaking News

खेळामुळे निर्माण होणार्‍या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : उर्मिला मोराळे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 05-01-2020 | 01:31:43 pm
  • 5 comments

खेळामुळे निर्माण होणार्‍या संधीचा

विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा :  मोराळे

स.भु क्रीडा महोत्सव समारोप सोहळा 

औरंगाबाद  : ग्रामीण भागातील मुलांमध्ये काटकपणा आणि लवचिकता असते. कारण शहरी मुलांच्या तुलनेत ते निसर्गाच्या जास्त जवळ असतात. त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स.भु. ने ही अतिशय चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. ही अतिशय चांगली अशी बाब आहे. मी स्वतः खेळाडू असल्याने मला त्यातील गुणांचा उपयोग प्रशासन सांभाळताना झाला असे क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी प्रतिपादन केले. क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.

यशस्वी खेळाडूंची नावे शाळेच्या फलकावर लावण्यात यावीत ज्यामुळे पालकाचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल असे त्या पुढे मिळाल्या. खेळामुळे निर्माण होणार्‍या संधीचा लाभ घेवून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळात स्वतःला झोकून द्यावे असेही त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून संस्थाचालकांचाही उत्साह द्विगुणित झाला. पुढील वर्षी नियोजनात आणखी काही क्रीडा प्रकार वाढवण्याचा प्रयत्न करूत असे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स.भु. चे सरचिटणीस डॉ.नंदकुमार उकडगावकर यांनी सांगितले.

पाहुण्यांचा परिचय अनुराधा मिरजकर, अहवाल वाचन क्रीडा महोत्सव सचिव संगीता जहागीरदार, आभार प्रदर्शन हेमंत जोशी, बक्षीस वाचन चंद्रशेखर पाटील, तर सूत्रसंचालन कु.तेजस्विनी सावंत यांनी केले.प्रमुख उपस्थितांमध्ये व्यासपीठावर संस्था सदस्य प्रमोद माने, स्थानिक सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

4 जानेवारी 2020 निकाल-

कबड्डी- 14 वषर्ें मुले

1. स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव

2. स.भु.प्रशाला, रांजणी

3. स.भु.प्रशाला, बिडकीन

कबड्डी- 14 वषर्ें मुली

1. शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद

2. स.भु.प्रशाला, औरंगाबाद

3. स.भु.प्रशाला, बिडकीन

कबड्डी- 17 वषर्ें मुले

1. स.भु.प्रशाला, रांजणी

2. स.भु.प्रशाला, औरंगाबाद

3. स.भु.प्रशाला, बिडकीन

कबड्डी- 17 वषर्ें मुली

1. स.भु.प्रशाला, भराडी

2. स.भु.प्रशाला, रांजणी

3. स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव

खो-खो - 14 वषर्ें मुले

1. स.भु.प्रशाला, बालानगर

2. स.भु.प्रशाला, औरंगाबाद

3. स.भु.प्रशाला, गोंदेगाव

खो-खो - 14 वषर्ें मुली

1. स.भु.प्रशाला, बालानगर

2. स.भु.प्रशाला, औरंगाबाद

3. स.भु.प्रशाला, रांजणी

खो-खो - 17 वषर्ें मुले

1. स.भु.प्रशाला, औरंगाबाद

2. स.भु.प्रशाला, रांजणी

3. स.भु.प्रशाला, बालानगर

खो-खो - 17 वषर्ें मुली

1. स.भु.प्रशाला, बालानगर

2. स.भु.प्रशाला, रांजणी

3. स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव

व्हॉलीबॉल-14 वर्षे  मुले

1. स.भु.प्रशाला, औरंगाबाद 

2. स.भु.प्रशाला, जालना

3. स.भु.प्रशाला, वडोदबाजार 

व्हॉलीबॉल - 14 वषर्ें मुली

1. शारदा मंदिर कन्या प्रशाला,औरंगाबाद

2. स.भु.प्रशाला, वडोदबाजार

3. स.भु.प्रशाला, गोंदेगाव

व्हॉलीबॉल-17 वर्षे  मुले

1. स.भु.प्रशाला, औरंगाबाद 

2. स.भु.प्रशाला, बिडकीन

3. स.भु.प्रशाला, भराडी 

व्हॉलीबॉल - 17 वषर्ें मुली

1. स.भु.प्रशाला, गोंदेगाव

2. स.भु.प्रशाला, वडोदबाजार

3. स.भु.प्रशाला, औरंगाबाद

कुस्ती-  42 किलो

1. प्रांजल बरेटीये - स.भु.प्रशाला, औरंगाबाद

2. विनोद चव्हाण-   स.भु.प्रशाला, जालना

कुस्ती- 45 किलो

1. तालेब बेग, स.भु.प्रशाला, बिडकीन

2. प्रशांत चव्हाण,  स.भु.प्रशाला, रांजणी

कुस्ती- 48 किलो

1. रितेश आडे, स.भु.प्रशाला, जालना

2. विशाल गरड,  स.भु.प्रशाला, बिडकीन

कुस्ती- 51 किलो

1. भावेश देवरे, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

2. आसाद पठाण,  स.भु.प्रशाला, भराडी

कुस्ती- 55 किलो

1. मोहीत पाटील, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

2. अर्थव जाधव,  स.भु.प्रशाला, जालना

कुस्ती- 60 किलो

1. फैजान शेख, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

2. पवन राठोड,  स.भु.प्रशाला, जालना

 

कुस्ती- 80 किलो

1. पुष्कर गुरजाती, स.भु.प्रशाला, औरंगाबाद

 

कुस्ती- 92 किलो

1. शोहेब शकील शेख,  स.भु.प्रशाला, बिडकीन

--------------------------------------

शंभर टक्के समर्पण हेच यशाचे खरे सुत्र : मयूरा पेरे

औरंगाबाद (दि.3 जानेवारी 2020) शंभर टक्के समर्पण हेच यशाचे खरे सूत्र आहे. खेळामधून सुद्धा करियर घडविता येते. खेळाडूंना विशेष आरक्षणाद्वारे शासकीय सेवांमध्ये संधी मिळते. ही संधी केवळ खेळांच्या माध्यमातूनच मिळू शकते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सुप्रसिध्द खेळाडू मयूरा पेरे यांनी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेअंतर्गत आयोजित 10 व्या स.भु. क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.

आज खेळाडूंना अनेक क्षेत्र खुले आहेत त्यामुळे खेळाकडे दुर्लक्ष करू नये. खेळ आणि अभ्यास याचे संतुलन सांभाळून आपण उज्ज्वल भवितव्याकडे जाऊ शकतो. त्यासाठी खेळाडूंनी नेहमीच सराव करण्याकडे भर द्यावा असेही त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय समारोपात डॉ.उकडगावकर म्हणाले, खेळाचा अभ्यास हा देखील पुस्तकांच्या अभ्यासाइतकाच महत्त्वाचा आहे. उत्तम नियोेजन हे उत्कृष्ट यश संपादन करून देते. हे क्रिकेटचे उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केेले. खेळामुळे एकाग्रता, खिलाडूवृत्तीचा विकास होतो. जो दुसर्‍यांना हरवतो तो फक्त विजयी होतो. जो स्वत: हरतो तो यशस्वीपणे स्वत:ला स्वत:च्या उत्कृष्टतेने नेहमी पराजित करतो. यातून तुम्हाला यशस्वीतेचे शिखर मिळेल. खरी स्पर्धा ही आपली आपल्यासोबत असते.

यावेळी प्रमुख पाहुण्याचा परिचय क्रीडाशिक्षक संजय कंटुले यांनी करून दिला, प्रास्ताविक क्रीडा महोत्सवाच्या संयोजिका संगीत जहागीरदार  यांनी केले. आभार प्रदर्शन हेमलता जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री कुलकर्णी हिने केले. खेळाडूंचे संचलन क्रीडाशिक्षक चंद्रशेखर पाटील यांच्या मागदर्शनाखाली झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स.भु चे सरचिटणीस डॉ.नंदकुमार उकडगावकर यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर स.भु.चे सहचिटणीस अ‍ॅड.रामेश्वर तोतला, डॉ.उल्हास शिऊरकर,  जुगलकिशोर धूत, सहकोषाध्यक्ष रमेश जोशी तसेच स.भु.प्रशाला, औरंगाबादचे शालेय समिती अध्यक्ष प्रमोद माने,  शारदा मंदिर कन्या प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष डॉ.सुहास पानसे, स.भु.विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप जब्दे, प्रभारी प्राचार्य मकरंद पैठणकर, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव-निकाळजे, मुख्याध्यापक शिरीष मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा महोत्सवांतर्गत विविध समित्यांचे पदाधिकारी ज्यामध्ये  प्राचार्य डॉ.प्रदीप जब्दे, प्रभारी प्राचार्य मकरंद पैठणकर, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, मुख्याध्यापक शिरीष मोरे, सतीश पाठक, अनिल देशमुख, पूनम राठोड, संजय कंटुले, मंगेश डोलारे, धर्मेंद्र येवले, सुरेश म्हस्के, प्रेम गोरमे, पद्माकर इंगळे, अलका कलकोटे, हेमलता जगताप, राहूल अहिरे, अनुराधा मिरजकर, किशोर नावकर,  चंद्रशेखर पाटील, डॉ.दयानंद कांबळे व डॉ.विशाल देशपांडे अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

 

आजचे निकाल -मैदानी स्पर्धा

 

200 मीधावणे - 14 वषर्ें मुले

- प्रथम            -     ओंकार नाईक, स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव

- द्वितीय    -     शिवप्रसाद टेके, स.भु.प्रशाला, बिडकीन

- तृतीय      -     आकाश व्यवहारे,     स.भु.प्रशाला, भराडी

 

200 मीधावणे - 14 वषर्ें मुली

- प्रथम            -     मधुरा गोर्डे, स.भु.प्रशाला, औरंगाबाद

- द्वितीय    -     समृद्वी शिंदे, स.भु.प्रशाला, बिडकीन

- तृतीय      -     दिव्या कोलते, स.भु.प्रशाला, वडोदबाजार

 

200 मीधावणे - 17 वषर्ें मुले

- प्रथम            -     मंगेश कदम, स.भु.प्रशाला, भराडी

- द्वितीय    -     शेख नासेर, स.भु.प्रशाला, रांजणी

- तृतीय      -     आरीफ तडवी, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

 

200 मीधावणे - 17 वषर्ें मुली

- प्रथम            -     निकिता शेळके, स.भु.प्रशाला, भराडी

- द्वितीय    -     ख्ाुशी रौत्रे, शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद

- तृतीय      -     गायत्री अहिरे, स.भु.प्रशाला, गोेंदेगाव

 

400 मीधावणे - 14 वषर्ें मुले

- प्रथम            -     सोहम महेंद्रकर, स.भु.प्रशाला, औरंगाबाद

- द्वितीय    -     कृष्णा लकडे, स.भु.प्रशाला, भराडी

- तृतीय      -     यश खंबाट, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

 

400 मीधावणे - 17 वषर्ें मुली

- प्रथम            -     अक्षता चव्हाण, शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद

- द्वितीय    -     हर्षदा कदम, शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद

- तृतीय      -     ऋ तुजा वाघ, स.भु.प्रशाला, वडोदबाजार

 

400 मीधावणे - 17 वषर्ें मुले

- प्रथम            -     मुकुल खेडकर, स.भु.प्रशाला, जालना

- द्वितीय    -     अक्षय मोरे, स.भु.प्रशाला, भराडी

- तृतीय      -     मोहीत पाटील, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

 

400 मीधावणे - 17 वषर्ें मुली

- प्रथम            -     यशोदा घोगरे, स.भु.प्रशाला, औरंगाबाद

- द्वितीय    -     प्रतिक्षा रोडे, स.भु.प्रशाला, बालानगर

- तृतीय      -     वैष्णवी तांबे, स.भु.प्रशाला, बालानगर

 

    800 मीधावणे - 14 वषर्ें मुले

- प्रथम            -     प्रशांत जालेवार, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

- द्वितीय    -     प्रणव जंजाळ, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

- तृतीय      -     दीपक तांबे, स.भु.प्रशाला, बालानगर

 

   800 मीधावणे - 14 वषर्ें मुले

- प्रथम            -     ऋ तुजा वाघ , स.भु.प्रशाला, वडोदबाजार

- द्वितीय    -     ऋ तुजा तौर, स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव

- तृतीय      -     वैष्णवी गबाळे, स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव

 

800 मीधावणे - 17 वषर्ें मुले

- प्रथम            -     अरुण गुळवे, स.भु.प्रशाला, भराडी

- द्वितीय    -     सुमीत मगर, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

- तृतीय      -     निखिल बिराडी, स.भु.प्रशाला, गोंदेगाव

 

800 मीधावणे - 17 वषर्ें मुली

- प्रथम            -     पूर्वा पाटील, शारद मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद

- द्वितीय    -     शीतल शेजूळ, स.भु.प्रशाला, भराडी

- तृतीय      -     मुक्ता लहाने, स.भु.प्रशाला, रांजनी

 

कबड्डी- 14 वषर्ें मुले

स.भु.प्रशाला, औरंगाबाद वि.वि. स.भु.प्रशाला, वडोदबाजार

स.भु.प्रशाला, रांजणी वि.वि. स.भु.प्रशाला, भराडी

 

कबड्डी- 14 वषर्ें मुली

स.भु.प्रशाला, औरंगाबाद वि.वि. स.भु.प्रशाला, जालना

शारदा मंदिर कन्या प्रशाला, औरंगाबाद वि.वि. स.भु.प्रशाला, बिडकीन

 

कबड्डी- 17 वषर्ें मुले

स.भु.प्रशाला, रांजणी वि.वि. स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव

 

कबड्डी- 17 वषर्ें मुली

स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव  वि.वि. स.भु.प्रशाला, बिडकीन

स.भु.प्रशाला, रांजणी वि.वि. स.भु.प्रशाला, वडोदबाजार

 

खो-खो- 14 वषर्ें मुले

स.भु.प्रशाला, औरंगाबाद वि.वि. स.भु.प्रशाला, वडोदबाजार

स.भु.प्रशाला, भराडी वि.वि. स.भु.प्रशाला, जालना

स.भु.प्रशाला, गोंदेगाव  वि.वि. स.भु.प्रशाला, कुंभारपिंपळगाव

स.भु.प्रशाला, बालानगर वि.वि. स.भु.प्रशाला, रांजणी

स.भु.प्रशाला, भराडी वि.वि. स.भु.प्रशाला, बिडकीन

 

खो-खो- 14  वषर्ें मुली

स.भु.प्रशाला, औरंगाबाद

Best Reader's Review