Breaking News

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: यामागुचीवर मात करत पी.व्ही. सिंधूची अंतिम सामन्यात धडक

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 04-08-2018 | 11:59:17 pm
  • 5 comments

जागतिक बॅडमिंटन : यामागुचीवर मात,

पी.व्ही.सिंधूची अंतिम सामन्यात धडक

नानजिंग (चीन): भारताची स्टार बॅडमिंटन पटू पी.व्ही सिंधू सलग दुसऱ्या वर्षी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत फायनल मध्ये पोहचली आहे. क्रमवारीमध्ये सिंधुपेक्षा एका क्रमांकाने वरती असलेल्या जपानच्या एकाने यामागुचीवर सिंधूने सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. ५५ मिनिटे चाललेल्या या सामन्यामध्ये सिंधूच्या गतीपुढे जपानी खेळाडू एकाचे सपशेल निष्प्रभ ठरली. सामन्यामध्ये एका वेळेस तर सलग आठ गन मिळवत आपणच या स्पर्धेचे खरे दावेदार असल्याचे सिद्ध केले.

हा सामना जिंकत सिंधूने फायनल मधील आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्यावर्षी सिंधूने भारतासाठी रजत पदक जिंकले होते. यावर्षी सुद्धा सिंधूने रजत पदक निश्चित केले आहे. फायनल मध्ये सिंधूची टक्कर स्पेनच्या कॅरोनिलना मारिन सोबत होणार आहे.

अंतिम लढतीत सिंधूला रशियाच्या कॅरोनिलना मारिनचे आव्हान असणार आहे.

Best Reader's Review