Breaking News

नदालच ‘क्ले कोर्ट’चा राजा, फ्रेंच ओपनचे 11वे विजेतेपद

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 10-06-2018 | 11:54:22 pm
  • 5 comments

नदालच ‘क्ले कोर्ट’चा राजा, 

फ्रेंच ओपनचे 11वे विजेतेपद

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 
पॅरिस – “क्‍ले कोर्ट’चा राजा असा लौकिक मिळविणारा राफेल नदाल फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विक्रमी 11वे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम लढतीत नदालने ऑस्ट्रियाच्या सातव्या मानांकित डॉमिनिक थिएमचा 6-4, 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत थिएमच्या पहिल्यावहिल्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा लांबवली आहे. नदालने या स्पर्धेत 2015 नंतर सलग 39 सामने जिंकले आहेत.

नदालने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीतील 24व्या ग्रॅंड स्लॅम अंतिम लढतीत सामना जिंकत एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत 11 विजेतेपदे जिंकण्याच्या मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मार्गारेट कोर्टने 1960 ते 1973 या कालावधीत हा मान मिळविला होता. नदालने फ्रेंच ओपनवर वर्चस्व गाजविताना मातीच्या कोर्टचा राजा हा किताबही पटकावला आहे.

सामन्यातील पहिला सेट नदालने आपल्या नावे केला मात्र त्याला यावेळी झगडावे लागले होते, सेटच्या सुरुवातीला नदाल आणि थिएम दोघेही आक्रमक खेळ सादर करत होते. त्यामुळे अंतीम सामना चुरशीचा होणार याचा अंदाज सर्वांनाच आला होता, मात्र यावेळी थिएमवर्चा दबाव स्पष्टपणे जाणवत होता, दबावात त्याने पहिल्याच सेट मध्ये तब्बल चार वेळा डबल फॉल्ट केला. यावेळी नदालने पहिला सेट 6-4 असा आपल्या नावे केला.

तर दुसऱ्या सेटमध्ये पहिल्या पासूनच नदालने थिएमवर वर्चस्व राखत सेटही आपल्या नावे केला, यावेळी थिएमला केवळ तीन सेट मध्येच विजय मिळवता आला. नदालने यावेळी नेट जवळ जाऊन परतीचे फटके मारत तब्बल सात पॉएंत आपल्या नावे केले मात्र थिएमला केवळ एकच नेट पॉइंट मिळवण्यात यश मिळाले. तर नदालने यावेळी 50 टक्के रिटर्न पॉइंत आपल्यानावे केले तर थिएमला केवळ 10% पॉइंट्‌स आपल्यानावे करता आले.
तिसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच थिएमने आक्रमक धोरण अवलंबून पहिला गेम आपल्या नावे केला. मात्र लागलीच नदालने पुनरागमन करत दुसरा गेम आपल्या नावे करत 1-1 अशी बरोबरी साधली. तर त्यानंतरचे दोन गेम पॉइंट मिळवत आघाडी मिळवली होती. मात्र त्यानंतरचा गेम पॉइंट मिळवत थिएमने तिसऱ्या सेट मध्ये 2 गेम आपल्या नावे केले. मात्र पुन्हा नदालने पुनरागमन करत सेट सोबतच सामना आपल्या नावे केला.

Best Reader's Review