Breaking News

चेन्नईने तिस-यांदा जिंकला आयपीएल चषक

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 28-05-2018 | 12:51:14 am
  • 5 comments

चेन्नईने तिस-यांदा जिंकला

आयपीएल चषक,वॉटसनचे शतक

मुंबई – शेन वॉटसन च्या धमाकेदार नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 179 धावा करताना सनरायजर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करताना तिसऱ्यांदा आयपीयलचे विजेतेपद मिळवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 178 धावा करत चेन्नईसमोर 179 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना चेन्नईने हे आव्हान 18.3 षटकांत 2 गडी गमावत पुर्ण करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला सलामीवीर शेन वॉटसन. वॉटसनने तुफानी शतक ठोकले. वॉटसनने फक्त ५१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह शतक पूर्ण केले. वॉटसनने शेवटपर्यंत नाबाद राहात ५७ चेंडूत ११७ धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या आयपीएलमधील वॉटसनचे हे दुसरे शतक आहे. सुरेश रैनाने ३२ धावांचे योगदान दिले. डू प्लेसिस १० धावांवर बाद झाला.

धोनीच्या नेतृत्तावखाली चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचा चषक जिंकण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईने आयपीएल चषक जिंकला होता. चेन्नईने तीन आयपीएल जिंकत मुंबईची बरोबरी केली आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएल चषक जिंकला होता.

त्याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने युसूफ पठाण नाबाद ४५, कर्णधार केन विलियम्सन ४७ आणि ब्रेथवेटच्या तुफानी २१ धावांच्या बळावर २० षटकात ६ बाद १७८ धावा केल्या. चेन्नईकडून निगडी, ठाकूर, करण शर्मा, ब्राव्हो आणि जाडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला.नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीचा विश्वास त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी माघारी परतल्यानंतर, शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसनने काही क्षणांसाठी संघाचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादचे फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये अपयशी ठरले. छोटेखानी भागीदाऱ्या रचल्यानंतर हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिले. केन विल्यम्सन आणि युसूफ पठाण यांच्या दमदार खेळींच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादला चेन्नईपुढे 179 धावांचे आव्हान ठेवता आले. केन विल्यम्सनने 36 चेंडूंत 47 धावांची खेळी साकारली. केन बाद झाल्यावर आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या युसूफ पठाणने धमाकेदार फटकेबाजी केली. पठाणने 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा केल्या.अखेर तळातल्या युसूफ पठाण आणि कार्लोस ब्रेथवेटने फटकेबाजी करत संघाला 178 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

  • फायनलमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक ठोकणारा पहिला खेळाडू
  • वॉटसनचे तुफानी शतक, ५१ चेंडूत १०० धावा पूर्ण

 

Best Reader's Review