Breaking News

सानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 24-04-2018 | 02:06:30 am
  • 5 comments

सानिया मिर्झाची चाहत्यांना ‘गोड’ बातमी

नवी दिल्ली – भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक लवकरच आई-बाबा बनणार आहेत. आपल्या ट्‌विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सानियाने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सानिया आई होणार असून तिने हटके अंदाजात ही गूड न्यूज आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. सानियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक हटके पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सानियाने एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोमध्ये एक वार्डरोब दिसत आहे. त्यामध्ये तीन खण असून त्यातील दोन खण सानिया आणि शोहेब मलिक अशी नावे दिली आहेत तर तिसऱ्या खणाला मिर्झा मलिक असे नाव दिले आहे. तिसऱ्या खणात छोट्या बाळाचे कपडे आणि दुधाची बाटलीही दिसत आहे. सानियाने हा फोटो ‘बेबी मिर्झा मलिक’ असा हॅश टॅग देत शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सानियाने आपल्या अपत्याचे नाव मिर्झा-मलिक असे ठेवणार असल्याचे सांगितले होते. माझ्या आणि शोएबच्या नावाने माझे मूल भविष्यात ओळखले जावे, अशी आपली इच्छा असल्याचे सानियाने म्हटले होते. तिचे वडील आणि प्रशिक्षक इम्रान मिर्झा यांनी या बातमीला दुजोरा दिला असून येत्या ऑक्‍टोबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सानिया आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला कन्यारत्न हवे असल्याची इच्छा व्यक्‍त केली होती. बाळाचं आडनाव मिर्झा-मलिक असेल, असेही तिने सांगितले होते. 31 वर्षीय सानिया मिर्झाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला होता. हैदराबादमध्ये पारंपरिक पाकिस्तानी पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला होता. यानंतर तब्बल 8 वर्षांनी सानिया आणि शोएबच्या घरात पाळणा हलणार आहे.

टेनिसमध्ये आतापर्यंत अनेक महिला खेळाडूंनी बाळाला जन्म दिल्यानंतर पुनरागमन केले आहे. यात सेरेना विल्यम्स, किम क्‍लिस्टर्स या बड्या नावांचा समावेश आहे. क्‍लिस्टर्सने तर अपत्यजन्मानंतर निवृत्तीतूनही पुनरागमन केले होते. वर्षाच्या सुरुवातीस सानियाने फ्रेंच ओपनमधून पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते. परंतु या नव्या बातमीमुळे तिचे पुनरागमन चांगलेच लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Best Reader's Review