Breaking News

स्वामी वरदानंद भारती जन्मशताब्दी महोत्सवास १२ सप्टेंबरपासून होणार प्रारंभ

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 10:43:56 pm
  • 5 comments

प.पू. स्वामी वरदानंद भारती जन्मशताब्दी

महोत्सवास अनंत चतुर्दशीपासून होणार प्रारंभ

श्रीदासगणुमहाराज प्रतिष्ठान, गोरटे(उमरी-नांदेड)द्वारे राज्यात विविध ठिकाणी वर्षभर होणार विविध कार्यक्रम

औरंगाबाद:

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेल्या गोरटे येथील श्रीदासगणुमहाराज प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी वरदानंद भारती जन्मशताब्दी महोत्सवास अनंत चतुर्दशी अर्थात १२ सप्टेंबर २०१९ पासून सुरूवात होणार आहे. १ सप्टेंबर २०२० पर्यंत वर्षभर महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर तब्बल ३९ ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीदासगणुमहाराज प्रतिष्ठानच्या सूत्रांनी दिली. 

या धार्मिक कार्यक्रमात कीर्तन, पाठ,नाम-जप, ग्रंथ पारायण यासह दैनंदिन पूजाविधींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संतपरंपरा अाधुनिक  काळात अखंडपणे चालू ठेवण्याचे कार्य  श्री दासगणू महाराज  व  स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले ) यांनी   केले आहे.   शिक्षणाने आयुर्वेद तज्ञ , व्यवसायाने पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य  राहीलेले स्वामी  देव,देशआणि धर्मासाठी अखंड कार्यरत राहीले. कर्तव्यनिष्ठा, आत्मीयता, निस्वार्थीपणा, धैर्य,शांती,ईश्वरभक्ती व देशभक्ती यांनी परिपूर्ण असे स्वामीजींचे जीवन होते. “मी म्हणजे ना शरीर मी मद् ग्रंथांचा संभार “ असा संदेश देउन इ.स.२००२ मध्ये संजीवन समाधी घेतलेल्या स्वामीजींची प्रचंड ग्रंथ संपदा आणि त्याचे जीवन आजही आपल्याला उन्नतीकडे नेण्यास समर्थ आहे.   या महापुरूषाचे विचार घरोघरी पोचविवण्यासाठी या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन वर्षभर होत आहे.  याची सुरूवात गोरटे येथे १२ सप्टेंबर २०१९ला सकाळी ७ .३० वाजता सज्जनगडावरील श्रीरामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष आदरणीय श्री भूषण स्वामी  यांच्या हस्ते होईल. दिवसभरात ध्यानमंदिरातील प्रार्थना, प्रात:प्रार्थना, पूजा, ११ लाख विष्णुसहस्त्रनाम संकल्प , विष्णूसहस्रनामाचे  जीवनातील महत्व यावर भागवातचार्य श्री बा.ल. चोथवे यांचे व्याख्यान ,  संतचरित्राच्या माध्यमातून व्यक्तिविकास यावर सगरोळीचे संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद देशमुख यांचे व्याख्यान  व श्री महेश  आठवले यांचे कीर्तन होइल.. 

१२ सप्टेंबर नंतर राज्यातील विविध कार्यक्रमांना सुरूवात होईल.यात प्रार्थना, प्रवचन, व्याख्यान, कीर्तन, पारायण यांचा समावेश असेल. १५ ते २१ सप्टेंबर २०१९एकनाथ भवन काळ्यामारूतीजवळ पंढरपूर (संपर्क भागवातार्य- श्री वा..ना.उत्पात) , २१ ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान बालाजी मंदिर व्यंकटेशनगर परभणी(संपर्क- दिगंबर सेंदूरवाडकर),११ ते १३ ऑक्टोबर२०१९ नांदेड येथे संस्कृती सेवक विचार संघाकडुन सावरकर स्मृती सभागृह अशोकनगर, १९ ते २१ ऑक्टोबर २०१९ किनवट, १३ ते १७ नोव्हेंबर अंबेजोगाई, ४ ते ६ डिसेंबर लोणावळा, ९ ते ११ डिसेंबर इंदोर, १४ ते १५ डिसेंबर युवाशिबीर गोरटे, उमरी-नांदेड, २२ डिसेंबर २०१९ पनवेल, २३ ते २५ डिसेंबर सिडको नांदेड, २८ते ३० डिसेंबर उदगीर,  ५ ते ७ जानेवारी २०२० गोरटे श्रीदासगणू महाराज जयंती उत्सव, १० ते १२ जानेवारी २०२० रोजू देगलूर स्वामी वरदानंद भारती स्मरण महोत्सव, १७ते १९ जानेवारी२०२० औरंगाबाद, २८ ते ३० जानेवारी कोतवडे, १४ ते १८ फेब्रुवारी पुंडलिकवाडी नांदेड, २५ते २९ फेब्रुवारी मुखेड, १ ते ३ मार्च कोकलेगाव, १० ते१२ मार्च२०२० गोरटे, १३ ते १५ मार्च लाठी उस्माननगर, २० ते २२ मार्च मुदखेड,  १ ते ३ एप्रिल २०२० गोरटे, श्रीरामनवमी उत्सव, ४ एप्रिल २०२० श्रीदासगणु जन्मस्थान अकोळनेर, ११ ते १३ एप्रिल तळेगाव दभाडे(पुणे), १५ ते १९ एप्रिल२०२० साईमंदिर रामानंदनगर नांदेड, ५ मे ते ९ मे २०२० कैलासाश्रम उत्तराकाशी, २३ ते २४ मे २०२० बेंगलोर, २३ मे १ जून २०२०श्रीदासगणू प्रतिष्ठान श्रीगंगादशहरा गोरटे,  ७ ते ९ जून २०२० अकोला, ११ ते १३ जून२०२० नायगाव, १६ तेग १८ जून पुणे श्रीवामनशास्त्री पुण्यतिथी उत्सव, १२ जुलै २०२० रोजी निजामाबाद, १५ ते १९ जुलै २०२० पुणे, १४ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२० गोरटे स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथी महोत्सव व यानंतर २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० नांदेड येथे विविध कार्यक्रम होऊन स्वामी वरदानंद भारती जन्मशताब्दी महोत्सव सांगता होईल. संपूर्ण राज्यातील या विविध गावात नामांकित  व्याख्याते, कीर्तनकार, वरदानंद भारती यांचे अनुयायी व नामांकित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. गोरटे  येथे १२ सप्टेंबर २०१९ ते ९ ऑगस्ट २०२० पर्यंत १२ विविध विषयांवर विविध मान्यवर व्याख्यान देणार आहेत. 

गोरटे येथे ग्रंथ पारायण

महोत्सवात स्वामी वरदानंद भारती यांनी लिहिलेल्या तब्बल ६७ निरनिराळ्या ग्रंथाचे पारायण वर्षभर चालणार आहे. याची सुरूवातदेखील १२ सप्टेंबर पासून होईल व सांगता  ७ जुलै २०२० रोजी होईल. ग्रंथ पारायणे एकूण दिवस १८२ असणार आहेत. 

यांच्याशी साधता येईल संपर्क

संपूर्ण कार्यक्रमासंबंधी, महोत्सवासंबंधी आणि वर्षभर चालत असलेल्या विविध ठिकाणच्या महोत्सवांच्या दिवसांसंबंधी माहिती घेण्यासाठी श्रीदासगणुमहाराज प्रतिष्ठान, गोरटे(उमरी-नांदेड) येथे गार्गी देशपांडे ९४२१९०१०९८ व ७५०७११४११५  व  विक्रम नांदेडकर ९८५००२७६१८ यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. याशिवाय वर्षभर चालत असलेल्या ६७ निरनिराळ्या ग्रंथ पारायणासंबंधी माहितीसाठी संजय नेकलीकर ९८७०४०६०३३ किंवा जालंदर देशपांडे ९४२१८४९३९६ या नंबरवर संपर्क साधता येईल. 

औरंगाबादमधील कार्यक्रम

औरंगाबादला १७ ते १९ जानेवारी२०२० दरम्यान प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, साहित्यीक चर्चा, पारायण, काला कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. यासंबंधी अधिक माहितीसाठी सुधीर शिरडकर आणि डॉ.  स्वाती शिरडकर यांच्याशी ९१५८८९८०७९ किंवा ९८९०८९८०७८ या नंबरवर संपर्क साधावा. 

Best Reader's Review