Breaking News

साईबाबा शताब्दी महोत्सवास प्रधानमंत्री उपस्थित राहणार - खासदार सदाशिव लोखंडे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 07-04-2018 | 12:41:42 am
  • 5 comments

साईबाबा शताब्दी महोत्सवास प्रधानमंत्री

उपस्थित राहणार - खासदार सदाशिव लोखंडे

नवी दिल्ली,  ६ : शिर्डी येथे आयोजित होणाऱ्या १७१ व्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवातील नाम सप्ताहाचे निमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले असून या सप्ताहास प्रधानमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी  दिली.
 

श्री. लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज संसद भवन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी १७१ व्या साईबाबा समाधी शताब्धी महोत्सवानिमित्त दिनांक १६ ते २३ ऑगस्ट २०१८ दरम्यान शिर्डी येथे आयोजित सद्गुरु गंगागिरी महाराज नाम सप्ताहाचे निमंत्रण प्रधानमंत्री यांना दिले. ३० सदस्यीय शिष्टमंडळात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट मठाचे महंत रामगिरी महाराज, साईबाबा संस्थान ट्रस्टचे सप्ताह समितीचे सदस्य, साईबाबांच्या समकालीन भक्तगणांचे वंशज आणि शिर्डीचे मूळ ग्रामस्थ आदींचा समावेश होता.

Best Reader's Review