उगादी हा नव चैतन्याचा सण : व्यंकैय्या नायडू

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 18-03-2018 | 05:45:08 pm
  • 5 comments

उगादी हा नव चैतन्याचा सण : व्यंकैय्या नायडू

हैदराबाद :  मला उगादीच्या सणात सहभागी होताना अत्यंत आनंद होत आहे, उगादी हा एक नव चैतन्याचा, नवऊर्जेचा सण आहे, अशा भावना उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केल्या. हैदराबाद येथे तमिळ नववर्ष म्हणजेच उगादी हा सण साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आज नायडू बोलत होते.

भारतीय संस्कृतीतील सण हे विज्ञानानाधारित आहेत. नवीन वर्षाचा प्रारंभ निसर्गाच्या दृष्टीने, निसर्गाला अनुसरुन होतो. निसर्गात जेव्हा नवीन पालवी फुटत असते, तेव्हाच नवीन वर्षाचा प्रारंभ होतो, आपले सण आपल्या संस्कृतीचा आरसा आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
 
आज संपूर्ण भारतात गुढी पा़डवा, उगादी आणि चैत्र नवरात्राची सुरुवात असे सगळे सण साजरे करण्यात येत आहे. महाराष्ट्रात विविध शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे, तर दक्षिण भारतात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उगादी उत्सव साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण आहे.

Best Reader's Review