वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगा- हभप. कृष्णा महाराज आरगडे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-01-2018 | 12:10:04 am
  • 5 comments
वारकरी संप्रदायाचा अभिमान
बाळगा- कृष्णा महाराज आरगडे
काल्याचे किर्तन, महाप्रसादाने तःपपूर्ती महोत्सवाचा उत्साहात समारोप
औरंगाबाद : काल्याचे किर्तन म्ळणाजे भगवान, परमात्म्याचे चरित्र उच्चारण आहे. साधना केल्याने त्या परमात्म्याचे दर्शन, भक्ती ही वाढणारी असते. परमात्म्याकडे जाण्यासाठी कोणताही भेदभाव नाही. त्यामुळे त्या परमात्म्याची सेवा करतांना वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळगा असे मत हभप. कृष्णा महाराज आरगडे, बार्शीकर यांनी केले. 
 
विष्णूनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी महादेव मंदिरात रामकृष्ण हरि सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्‍ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी बार्शी येथील श्री कृष्णा महाराज आरगडे यांच्या काल्याचे किर्तनाचे आयोजन आज करण्यात आले होते. याप्रसंगी रामकृष्ण हरी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड, तपःपूर्ती महोत्सवाचे अध्यक्ष श्री. सुनिल इंगळे, सचिव श्री पुंडलिक गायकवाड, तथा सहसचिव श्री उत्तमराव शेळके, प्रशांत नरवडे यांची उपस्थिती होती.  
तपपूर्ती महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी बोलतांना श्री आरगडे महाराज यांनी गोविंदाच्या जयघोषात उपस्थितांना भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून जीवनातील वास्तव उलगडून सांगितले. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथांसह संत ज्ञानेश्‍वरांच्या अभंगाचे दाखले देत मानवी जीवनातील अनेक उदाहरणे दिली. नाद हा क्षणिक असतो मात्र छंद हा अनंतकाळ असतो. इश्‍वरनामाचा छंद प्रत्येकाला लागायला हवा. कारण किर्तनातच रोजच्या जगण्यातील प्रेमभावना असते असे त्यांनी उपस्थित हरिभक्‍तांना सांगितले. लहानपनापासूनच संस्कार झाले तर तरुण पीढीमध्ये परमार्थाची गोडी निर्माण होते. आपला धर्म, संस्कृती तसेच परंपरा ही आजच्या तरुण पीढीमध्ये रुजविण्या हेतू या तपःपूर्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात  5 ते 13 जानेवारी दरम्यान भव्य स्वरुपात करण्यात आले होते. रामकृष्ण हरि सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्‍ताहात राज्यभरातील संतांचे पुजन तसेच किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक जाणिवेतून भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन या दरम्यान करण्यात आले होते. महोत्सवात दिपोत्सव तसेच ज्ञानेश्‍वरी पारायण, हरिपाठ, भजन असे विविधा धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शहरतील लोकप्रतिनिधींनही या महोत्सवास आपली हजेरी लावली होती. महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामकृष्ण हरी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड यांनी हरिनाम सप्‍ताहाच्या कार्यकाळात सहकार्य केलेल्यांचे आभार व्यक्‍त केले. तपःपूर्ती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुनिल इंगळे, सचिव पुंडलिक गायकवाड, कृष्णा आरगडे महाराज, तथा सहसचिव श्री उत्तमराव शेळके यांच्यासह  मंडळाचे कार्यकारिणी सदस्य प्रदिपराव चिंतामणी, बारकु गायकवाड, लक्ष्मीकांत कलवार, सुधाकर बचाटे, धीरज सुर्यवंशी, संदिपराव चव्हाण, सोमनाथ शिंदे, बाळकृष्ण खरात, केशवराव शिंदे, राजेंद्र खोड, पंडीतराव माताडे, रामदास गावंडे, पांडूरंग कोयले, प्रतापराव निबांळकर, एन.ए. अधाने, कैलासराव काथार, शत्रुघ्न पोफळे मनोहर गायकवाड, प्रकाश उगारे आदिंनी परिश्रम घेतले.

Best Reader's Review