श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 27-09-2017 | 11:37:26 pm
  • 5 comments

श्री तुळजाभवानी देवीची भवानी

तलवार अलंकार महापूजा

 
शारदीय नवरात्र महोत्सव-२०१७

उस्मानाबाद :
शारदीय नवरात्र महोत्सवात बुधवार २७ सप्टेंबर रोजी सातव्या दिवशी तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्य व परराज्यातील चालत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. प्रशासनाच्या चोख व्यवस्थापनामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता चांगल्या पद्धतीने दर्शन घेता येत आहे.

श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशिर्वाद दिला होता, म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते.

भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, व्यवस्थापक (प्रशासन) सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.दरम्यान काल रात्री २६ सप्टेंबर रोजी श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या गुरुवार २८ सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.

Best Reader's Review