Breaking News

राज्यसभेची निवडणूक केली स्थगित

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 24-03-2020 | 11:44:41 pm
  • 5 comments

राज्यसभेची निवडणूक केली स्थगित

नवीन तारीख नंतर घोषित करणार

नवी दिल्ली, 24 मार्च 2020

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिनांक 06.03.2020.च्या अधिसूचना क्रमांक 318/ सीएस-मल्टी / 2020(1) द्वारे एप्रिल 2020 मध्ये निवृत्त होत असलेल्या 17 राज्यांमधील 55 सदस्यांच्या राज्यसभेतील जागा भरण्यासाठी निवडणूक घोषित केली होती. 18.03.2020 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी 10  राज्यांमधील 37 जागा बिनविरोध भरल्याचे जाहीर केले होते. आता संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि राजस्थान या राज्यांमधील 18 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुका 26.03.2020 (गुरुवार) रोजी होणार होत्या आणि आयोगाने पूर्वी जाहीर केल्यानुसार निवडणूक प्रक्रिया 30.03.2020 (सोमवार) पर्यंत पूर्ण करायची होती.

11.03.2020 रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने कोविड -19 ही जागतिक महामारी घोषित केली. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि  कर्मचारी व प्रशिक्षण विभाग यांनी कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्वे आणि सूचना जारी केल्या आहेत. 22.03.2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना कोविड -19 च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. यात उपनगरीय रेल्वे सेवांसह सर्व रेल्वे सेवा 31.03.2020 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत; रुग्णालये, दूरसंचार, औषधाची दुकाने, किरकोळ किराणा मालाची दुकाने इत्यादीसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर 23.03.2020 रोजी कळवण्यात आले आहे की देशांतर्गत वाणिज्यिक विमानसेवाही  आज मध्यरात्री 23.59 पासून थांबवण्यासह अन्य आदेश देण्यात आले आहेत. 24.03.2020 रोजी  राज्य सरकारांनी कोविड-19  च्या व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी स्थानिक वाहतुक रोखण्यासाठी  विविध आदेश जारी केले आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि राजस्थान या राज्यांनी कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत.

आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीनुसार कोणत्याही स्वरूपाची गर्दी टाळणे आवश्यक आहे,.त्यानुसार निवडणूक आयोगाने मतदानाला स्थगिती दिली आहे.लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 153 च्या तरतुदीनुसार या निवडणुकीची मुदत वाढविली आहे. या निवडणूक अधिसूचनेनुसार विहित केलेल्या उर्वरित कामकाजासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी या निवडणुकीसाठी आधीच प्रकाशित केलेली  उमेदवारांची यादी कायम राहील. मतदान आणि मतमोजणीची नवीन  तारीख सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जाहीर करण्यात येईल.

Best Reader's Review