Breaking News

'मला जगायचं आहे', सामूहिक बलात्कार पीडितेचे अखेरचे शब्द

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-12-2019 | 12:57:37 am
  • 5 comments

'मला जगायचं आहे', सामूहिक

बलात्कार पीडितेचे अखेरचे शब्द

नवी दिल्ली: उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री 11.40 वाजता दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. रात्री 11.10 च्या सुमारास पीडितेकडून उपचारास प्रतिसाद मिळणं बंद झालं. त्याचबरोबर हृदयही काम करत नसल्याचं समजलं. त्यानंतर डॉक्टरांनी पीडितेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तिची झुंज अपयशी ठरली. पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. शलभ कुमार यांनी दिली.

सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा ती 90 ते 95 टक्के जळाली होती. तिच्या अवस्थेत कोणतीही सुधारणा होत नव्हती. व्हेंटिलेटरवर असलेल्या पीडितेसाठी 48 तास महत्वाचे होते. मात्र अखेर शुक्रवारी रात्री तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

उपचार सुरू असतानाही पीडितेनं धीर सोडला नव्हता. 'उपचारादरम्यान मी वाचेन ना, मला जगायचं आहे.' असा जप पीडित तरुणी सातत्यानं करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याआधी गुरुवारी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुद्धीत असताना आपल्या भावाला तिने सांगितलं की, आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी त्यांना सोडू नको.

सामूहिक बलात्काराचे हे प्रकरण डिसेंबर 2018 मध्ये घडले होते. मात्र, याबाबत 2019 मध्ये खटला दाखल करण्यात आला होता. गुरुवारी पीडिता न्यायालयात सुनावणीसाठी जात होती. त्यावेळी आरोपींनी रस्त्यात तिच्यावर हल्ला केला होता. या पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, 12 डिसेंबर 2018 रोजी शिवम आणि त्याचा मित्र शुभम त्रिवेदी लग्न करण्याच्या बहाण्याने मंदिरात घेऊन पीडितेवर सामुहिक बलात्कार केला होता. बिहार पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी शिवम आणि शुभम त्रिवेदला अटक करून तुरुंगात डांबलं होते.

शिवमसोबत होते प्रेमसंबंध

पीडितेचे गावातील शिवम त्रिवेदी याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. शिवमने रायबरेली येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने रायबरेली येथे एका खोली बंद केलं होते.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या मृत्यूवर त्यांनी दुख: व्यक्त केलं. मीडियाशी बोलतानी प्रियंका गांधी वाड्रा यांनी, गेल्या एक वर्षापासून संपूर्ण कुटुंबाला त्रास देण्यात येत आहे. आरोपींचं भाजपाशी काही संबंध असल्याचं ऐकण्यात आलं आहे. त्यामुळेच आरोपींना संरक्षण दिलं जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारांमध्ये कोणतीही भीती राहिली नसल्याचं त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधी वाड्रा यांनी  पीडितेच्या कुटुंबियांची घेतली भेट

प्रियंका गांधी वाड्रा यांनी ट्विट करत, उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधत कायदा-व्यवस्था, पोलीसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये महिलांसाठी जागा आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Best Reader's Review