Breaking News

व्यापक जनादेशाचा आदर करा : मोदी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 17-11-2019 | 11:17:14 pm
  • 5 comments

व्यापक जनादेशाचा आदर करा : मोदी

नवी दिल्ली : व्यापक जनादेशाचा आदर करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहकारी पक्षांना सांगितले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी हे विधान केले.

आपल्यातील छोटे मोठे मतभेद असले तरी आपण एकत्र रहायला हवे. आपण एक मोठे कुटुंब आहोत. लोकांसाठी आपण एकत्र काम करूया. आपला व्यापक जनादेश मिळाला आहे. त्याचा आदर करूया. आपण समविचारी आहोत. आपल्या काही विचारधारांमध्ये फरक आहे. मात्र त्यामुळे आपण अस्वस्थ होण्याची गरज नाही, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, या बैठकीनंतर बोलाताना लोकजनशक्ती पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष चिराग पासवान बैठकीनंतर पत्रकारांना म्हणाले,रालोआतील सर्वात जुना साथिदार शिवसेनेची उणीव आम्हाला जाणवली. त्याचबरोबर रालोआतून बाहेर पडणाऱ्या पक्षांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. प्रथम तेलगू देसमने रालोआ सोडली. त्यापाठोपाठ राष्ट्रीय लोकसमता पक्षाने वेगळी चूल मांडली. आता शिवसेनेने तीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे रालोआसाठी एक निमंत्रक नेमण्याची गरज आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. त्यात नरेंद्र मोदी म्हणाले, संसदेत भाजपाच्या सदस्यांची उपस्थिती असली पाहिजे. महत्वाचे विषय त्यांनी मांडले पाहिजेत.
संसदेच्या सोमवारी सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर कामकाज सुरळीत चालावे, म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

Best Reader's Review