Breaking News

शहा म्हणतात राज्यात भाजप-शिवसेनेचेच सरकार येणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 17-11-2019 | 11:13:37 pm
  • 5 comments

शहा म्हणतात राज्यात भाजप-शिवसेनेचेच सरकार येणार

रामदास आठवले यांची माहिती 

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज (17 नोव्हेंबर) भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यावेळी आठवले यांनी अमित शहा यांच्यासोबत भाजप-शिवसेना युतीवर चर्चा केली.

या चर्चेमध्ये शाह यांनी “काळजी नको सर्व ठीक होईल, राज्यात भाजप-शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचं म्हंटल” असं आठवलेंनी सांगितलं. महाराष्ट्रीतील सत्ता स्थपनेचा तिढा अद्याप ही सुटला नसून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.त्यामुळे रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, यावेळी आठवलेंनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याशीही चर्चा केली.

Best Reader's Review