Breaking News

श्रीलंकेत राजपक्षे सत्तेवर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 17-11-2019 | 10:57:07 pm
  • 5 comments

श्रीलंकेत राजपक्षे सत्तेवर

कोलंबो : श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. रविवारी दुपारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात त्यांनी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार सजीथ प्रेमदासा यांच्यावर मात केली. सजीथ प्रेमदासा यांनी स्वतःचा पराभव मान्य केला आहे.

शिवाय प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार गोटाबाया राजपक्षे यांना शुभेच्छाही दिल्या. राजपक्षे हे श्रीलंकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष असतील. सात महिन्यांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान पार पडले होते. राष्ट्रपतीपदासाठी ३२पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. १.५९ कोटी मतदारांपैकी जवळपास ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Best Reader's Review