Breaking News

सरकारी अभियंत्याच्या घरात सापडली अडीच कोटींची रोकड

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 16-11-2019 | 11:36:41 pm
  • 5 comments

सरकारी अभियंत्याच्या घरात सापडली अडीच कोटींची रोकड

जमशेदपूर : झारखंडमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका सरकारी अभियंत्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यावेळी मोठे घबाड सापडले. संबंधित अभियंत्याच्या घरातून तब्बल 2 कोटी 44 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली.

झारखंडच्या ग्रामविकास खात्यात कार्यरत असणारा सुरेशप्रसाद वर्मा हा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या कारवाईचा लक्ष्य ठरला. एका कंत्राटदाराची थकलेली बिले मंजूर करण्यासाठी वर्माने लाच मागितली. त्या कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने गुरूवारी सापळा रचला. वर्माला 10 हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

अटकेनंतर वर्माची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून त्याने मोठी माया जमवल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे एसीबीने वर्मा याच्या घरावर छापा टाकला. त्या कारवाईवेळी प्रचंड रोकड हाती आली. त्याच्या घरातून काही सोने आणि जमिनींची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली. वर्माने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवल्याचा संशय आहे. त्यावरून तो आता इतर यंत्रणांच्याही रडारवर आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Best Reader's Review