100 दिवस ऱ्हासाचे : प्रियांका गांधी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 07:53:50 pm
  • 5 comments

100 दिवस ऱ्हासाचे : प्रियांका गांधी

नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी पुन्हा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आता सरकारने दुसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण केल्याचे निमित्त साधून विविध कार्यक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. त्याचा संदर्भ घेत मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवरून प्रियांका यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनी  भाजप सरकारवर तोफ डागली आहे. व्यापार ठप्प होऊन अर्थव्यवस्था कोलमडली असताना सरकार गप्प बसले आहे. खोटा प्रचार करुन देशाच्या जनतेची दिशाभूल सुरु आहे, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. 

भाजप सरकार 100 दिवसांचा कार्यकाळ साजरा करणार आहे. मात्र, वाहन, वाहतूक आणि खाण उद्योग त्याकडे आपल्या ऱ्हासाचा जल्लोष म्हणून पाहतील. प्रत्येक क्षेत्रातून कारखाने बंद होण्याच्या आणि नोकऱ्या जाण्याच्या बातम्या येत आहेत, असे ट्‌विट प्रियांका यांनी केले आहे.

राहुल गांधींचा सरकारला टोमणा

 

Rahul Gandhi@RahulGandhi

Congratulations to the Modi Govt on , the continued subversion of democracy, a firmer stranglehold on a submissive media to drown out criticism and a glaring lack of leadership, direction & plans where it’s needed the most - to turnaround our ravaged economy.

----------------------------

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यपूर्तीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. विकासाशिवाय १०० दिवसांच्या कार्यकाळ पूर्तीसाठी अभिनंदन! अशा शब्दांत त्यांनी सरकारला टोला लगावला.

संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यात सरकारचे नेतृत्व कमी पडत असून दिशा आणि योजनांचा अभाव दिसून येतो, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केलेल्या एनडीएने दुसऱ्या हंगामातील १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. 

 

Best Reader's Review