लष्कर प्रमुखांसह इम्रानखान यांनी केली एलओसी परिसरात पहाणी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 07:30:20 pm
  • 5 comments

लष्कर प्रमुखांसह इम्रानखान यांनी

केली एलओसी परिसरात पहाणी

इस्लामाबाद: पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा यांच्या समवेत पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रत्यक्ष ताबारेषेच्या परिसरात जाऊन शुक्रवारी तेथील स्थितीची पहाणी केल्याचे वृत्त आहे. यावेळी त्यांच्या समवेत संरक्षण मंत्री परवेझ खट्टक, विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी, काश्‍मीर विषयक विशेष समितीचे प्रमुख सय्यद फकर इमाम हेही यावेळी उपस्थित होते.

काल हुतात्मा दिन होता त्या पार्श्‍वभूमीवर या भेटीला महत्व आहे. इम्रानखान यांनी सैनिकांची विचारपूस केली आणि जखमी जवानांचीहीं त्यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला. तसेच त्यांनी तेथील पाकिस्तानी बाजूकडील सुरक्षा स्थितीचाही आढावा घेतला. काश्‍मीरच्या संबंधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे अशी फुशारकी पाक सरकार मधील अनेकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान आता लढाईची तयारी करीत आहे असा अन्वयार्थ पाकिस्तानी मिडीयातील अनेकांनी लावला आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या एलओसी भेटीला तिकडे महत्व दिले जात आहे.

Best Reader's Review