Breaking News

कायदा करून राम मंदिर बनवावे – उद्धव ठाकरे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 16-06-2019 | 08:44:37 pm
  • 5 comments

कायदा करून राम मंदिर बनवावे – उद्धव ठाकरे

अयोध्या –  शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे उद्या शिवसेनेच्या १८ नवनिर्वाचित खासदारांसह  अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचं दर्शन घेतलं  लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत अयोध्येचा दौरा केला आहे. दरम्यान, रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ही जागा अशी आहे, जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे. हिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे. पहिले मंदीर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत असं त्यांनी सांगितले.

  • दुष्काळामध्ये शिवसेनेने पक्ष म्हणून काम केले आहे, त्याच्या अर्धे काम तरी आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी (विरोधकांनी) केलं आहे का ?
  • इथे मंदीर व्हावं ही लोकांची इच्छा आहे
  • पहिले मंदीर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत
  • हिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे
  • मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे
  • ही जागा अशी आहे, जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते
  • राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच
  • पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेनंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापला

Best Reader's Review