Breaking News

मसूद अजहर ‘जी’! राहुल गांधींची मुक्ताफळे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 11-03-2019 | 11:38:23 pm
  • 5 comments

मसूद अजहर ‘जी’! राहुल गांधींची मुक्ताफळे

 

नवी दिल्ली : पुलवामा येथे भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेविषयी आणि तिचा म्होरक्या मसूद अझहरविषयी देशभरात उसळलेली संतापाची लाट अजूनही शमलेली नाही. दुसरीकडे, काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी मात्र या दहशतवाद्याचा उल्लेख आदरार्थी करत आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या एका सभेत राहुल यांनी मसूद अझहरचा उल्लेख चक्क ‘मसूद अझहरजी’ असा केला. राहुल गांधींच्या या मुक्ताफळांचा देशभरातील अनेक नागरिकांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.
 

सोमवारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या झालेल्या एका मेळाव्यात राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित याही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. राहुल यांनी आपल्या भाषणाद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावेळी पुलवामा हल्ल्याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “पुलवामामध्ये बॉम्ब फुटला. सीआरपीएफचे ४०-४५ लोक शहीद झाले. कोणी बॉम्ब फोडला? जैश-ए-मोहम्मदने. ५६ इंच छातीवाल्यांच्या आधीच्या सरकारने विमानाने मसूद अझहर’जीं’सोबत बसून कंदाहार येथे जाऊन सुपूर्द केले.” राहुल गांधी पुढे म्हणाले की, “पुलवामा हल्ला पाकिस्तानी लोकांनी, जैशने केला. परंतु, मसूद अझहरला भाजप सरकारने सोडले. काँग्रेसचे दोन पंतप्रधान शहीद झाले परंतु ते कुणासमोर कधी झुकले नाहीत.” देशात २०१९ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार असल्याचा दावाही राहुल यांनी यावेळी केला. तसेच, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर भारत हा चीनशी स्पर्धा करणे सुरू करेल, असाही दावा त्यांनी केला.

पुन्हा एकदा संघ, सावरकरांवर चिखलफेक

गेले अनेक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सातत्याने चिखलफेक करणाऱ्या राहुल गांधींनी यावेळेसही तेच केले. “आरएसएसची विचारधारा भयाची, द्वेषाची आहे. परंतु, आम्ही काँग्रेसी आहोत, आम्हाला जेवढे मारायचे आहे तेवढे मारा, काही फरक पडणार नाही.” असे ते म्हणाले. तसेच, तुम्हाला गांधींचा हिंदुस्थान हवा आहे की गोडसेचा असाही प्रश्न त्यांनी विचारला. स्वा. सावरकरांनी ब्रिटीशांची ९ वेळा माफी मागितली, असा आरोपही राहुल गांधींनी पुन्हा एकदा केला.

Best Reader's Review