Breaking News

रमजानच्या महिन्यात निवडणुकीला मुस्लिम धर्मगुरुंचा विरोध

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 11-03-2019 | 11:32:59 pm
  • 5 comments

रमजानच्या महिन्यात निवडणुकीला मुस्लिम धर्मगुरुंचा विरोध

 

नवी दिल्ली : रविवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक ७ टप्यांमध्ये होणार असून शेवटचे ३ टप्पे हे रमजानच्या महिन्यात येत आहेत. यामुळे मुस्लीम धर्मगुरुंनी या तारखांना विरोध केला आहे. रमजान महिन्यात मतदान ठेवल्याने मतदानाचा टक्का घसरु शकतो, त्यामुळे शेवटच्या तीन टप्प्यातील मतदानाच्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागणी मुस्लिम धर्मगुरुंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

देशभरात ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेवटच्या तीन टप्प्यात ६,१२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. या तीनही तारखा रमजान महिन्यात येतात. या काळात मुस्लिम धर्मियांचा उपवास असतो. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो असे मुस्लिम धर्मगुरुंचे मत आहे. त्यामुळे याकाळात मतदान घेऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक रविवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले. शेवटच्या तीन टप्प्यांपर्यंत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांत मतदान होणार आहे. या तीनही राज्यांमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे.

Best Reader's Review