Breaking News

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 31-01-2019 | 12:03:23 am
  • 5 comments

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 

सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपणार 

नवी दिल्ली : उद्यापासून लोकसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होत आहे. देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले असून सत्ताधारी भाजपचा हा आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प ठरणार आहे. निवडणूका तोंडावर आल्या असल्याने सरकारतर्फे सादर करण्यात येणारा हा अर्थसंकल्प सामान्यांसाठी भरघोस लोककल्याणकारी योजनांची भेट घेऊन येणार असल्याची दाट शक्यता आहे. विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी या अधिवेशनामध्ये राफेल करार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचा प्रश्न लावून धरला जाणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीस संबोधित करणार आहेत.अर्थमंत्री पियुष गोयल हे शुक्रवारी (१ फेब्रुवारी) २०१९-२०२० सालसाठीचा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर करणार असून या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे खास भेट दिली जाण्याची शक्यता आहे.

Best Reader's Review