दिवाळीत फटाक्यांना परवानगी, पण ऑनलाईन विक्रीवर बंदी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 24-10-2018 | 01:23:03 am
  • 5 comments

दिवाळीत फटाक्यांना परवानगी,

पण ऑनलाईन विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखता यावे यासाठी देशभरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी. अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. परंतु ही मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे.

फटाके विक्रीला परवानगी दिली असली तरी फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर मात्र बंदी घालण्यात आली आहे. तसेच ई-कॉमर्स कंपन्यांना तशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. दिवाळीत रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके फोडावेत असे बंधन नागरिकांना घालण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या बाबतीत हा महत्वपूर्ण निर्णय दिला. परवाना असलेले ट्रेडर्सच फटाक्यांची विक्री करू शकतात. असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच फटाक्यांवर देशभरात बंदी घालताना त्या काळाच संतुलन ठेवणे गरजेचे आहे. संविधानाचा अनुच्छेद-२१ हा सर्वांना लागू होतो. ज्यामुळे कमी प्रदूषण होते असे ग्रीन फटाके विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

 

Best Reader's Review