Breaking News

भारताची भूमिका अहंकारी वृत्तीची – इम्रान खान

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 07:24:08 pm
  • 5 comments

भारताची भूमिका अहंकारी वृत्तीची – इम्रान खान

इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारी चर्चा रद्‌द झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भडकले असून त्यांनी ट्‌विटरवरून भारताच्या निर्णयावर नाराजी व्यक्‍त केली. भारताची भूमिका ही अहंकारी आणि संकुचित वृत्तीची असल्याचे म्हणत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाण साधला आहे.

----------------------------------

Disappointed at the arrogant & negative response by India to my call for resumption of the peace dialogue. However, all my life I have come across small men occupying big offices who do not have the vision to see the larger picture.

इम्रान खान यांनी ट्‌वीट केले की, दोन्ही देशांमध्ये शांती बहाल करण्यासाठी शांती वार्ता सुरू करण्याच्या माझ्या पहिल्या प्रयत्नाला भारताने दिलेल्या अहंकारी आणि नकारात्मक उत्तरामुळे मी निराश आहे. माझ्या जीवनात मी अनेक छोट्या लोकांना मोठ्या पदांवर जाताना पाहिले आहे. त्यांच्यामध्ये दूरदृष्टीचा अभाव असतो, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी शुक्रवारी ही भेट रद्‌द केल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, पाकिस्तानस्थित संघटनांद्वारे जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांच्या अत्यंत क्रूरपणे हत्या केल्या होत्या. तर दुसरीकडे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे समर्थन करणारी 20 टपाल तिकीटे प्रकाशित केली. यावरुन पाकिस्तान आपला मार्ग कधीही बदलणार नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळेच चर्चेपूर्वीच पाकच्या सैतानी भुमिकेचा पर्दाफाश झाला आहे. त्याचबरोबर पाकस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहराही जगासमोर आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या चर्चेला अर्थ नाही.

Best Reader's Review