Breaking News

राजकारणातला ‘भीष्म’ काळाच्या पडद्याआड- शरद पवार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 17-08-2018 | 12:57:24 am
  • 5 comments

राजकारणातला ‘भीष्म’ काळाच्या

पडद्याआड- शरद पवार

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९४वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

किडनी संसर्गामुळे अटल बिहारी वाजपेयी यांना ११ जून रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री एम्सने जारी केलेल्या बुलेटीननुसार, वाजपेयींची प्रकृती मागील २४ तासात चिंताजनक होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी निधनामुळे आपण एक महान आत्मा, एक प्रशंसनीय कवी, उत्कृष्ट मानव आणि भारतातील महान संसदपटू, राजकारणातला भीष्म काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.

 

Best Reader's Review