Breaking News

अटलजींचे विराट व प्रेमळ व्यक्तीमत्व कायम आठवणीत राहिल : राष्ट्रपती

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 17-08-2018 | 12:53:26 am
  • 5 comments

अटलजींचे विराट व प्रेमळ व्यक्तीमत्व

कायम आठवणीत राहिल : राष्ट्रपती

नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान, कवी, मुत्सदी नेता अशी अोळख असलेले भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी एम्स रूग्णलयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागच्या दोन महिन्यांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून अटलजींना श्रध्दाजंली वाहिली आहे. प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील महान व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने मला अतिशय दु:ख झालं. विलक्षण नेतृत्व, दूरदृष्टी आणि अदुभत भाषण हे त्यांना एक मोठं व्यक्तिमत्व बनवतं. अटलजींचे विराट आणि प्रेमळ असे व्यक्तिमत्व आमच्या आठवणीत कायम राहिल’.

President of India✔@rashtrapatibhvn

पूर्व प्रधानमंत्री व भारतीय राजनीति की महान विभूति श्री अटल बिहारी वाजपेयी के
देहावसान से मुझे बहुत दुख हुआ है। विलक्षण नेतृत्व, दूरदर्शिता तथा अद्भुत भाषण उन्हें
एक विशाल व्यक्तित्व प्रदान करते थे।उनका विराट व स्नेहिल व्यक्तित्व हमारी स्मृतियों में बसा रहेगा—राष्ट्रपति कोविन्द

5:42 PM - Aug 16, 2018

Best Reader's Review