Breaking News

कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी अटलबिहारी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष!

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 17-08-2018 | 12:41:16 am
  • 5 comments

कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी

अटलबिहारी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष!

कारगिल युद्धापूर्वी 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान सोबत चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. दरम्यान त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले होते.

एकीकडे वाजपेयींचे पाकिस्तान सोबत मैत्री करण्याचे प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर -५० पर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून खाली केल्या जात असत. न्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौकीवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवली. जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. तेव्हा पाकिस्तानला त्यांचा पराभव दिसत होता त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागितली. चीनने मदत नाकारल्यानंतर त्यांनी अमेरिकेकडे मदत मागितली

तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत. वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला.

Best Reader's Review